प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापुरात 'वन बूथ - टेन युथ' अभियानाचा श्रीगणेशा; वाढदिवसाला हार-तुऱ्यांऐवजी पुस्तकांचे आवाहन
इंदापूर:लोकनेते प्रदीप दादा गारटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. "माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवतानाच पक्षाची बांधणी अधिक भक्कम करण्यावर भर द्यावा," असे आवाहन स्वतः प्रदीप दादा गारटकर यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी 'वन बूथ - टेन युथ' हा संकल्प केला आहे.
संघटनात्मक बांधणीवर भर: 'वन बूथ - टेन युथ'
भारतीय जनता पार्टीच्या बळकटीकरणासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक बूथवर जाऊन कार्यकर्त्यांची फौज उभी केली जात आहे. या अभियानांतर्गत:
* प्रत्येक बूथवर एक बी.एल.ए. (Booth Level Assistant) आणि १० तरुण कार्यकर्त्यांची निवड केली जात आहे.
* हे अभियान २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबवले जाणार आहे.
या अभियानाची अधिकृत सुरुवात आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता 'गुरुकृपा सांस्कृतिक भवन' येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला इंदापूर तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हार-तुऱ्यांऐवजी द्या 'पुस्तकांची' भेट
प्रदीप दादा गारटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना एक विशेष विनंती केली आहे. वाढदिवसानिमित्त भेटायला येताना हार, तुरे, शाली किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत. त्याऐवजी एखादे वाचनीय पुस्तक भेट म्हणून द्यावे. ही सर्व गोळा झालेली पुस्तके शहरातील अभ्यासिकेला आणि वाचनालयाला भेट दिली जाणार आहेत, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि वाचनाची ओढ असणाऱ्या युवक-युवतींना त्याचा फायदा होईल.
"पक्षाची संघटनात्मक बांधणी हेच माझ्या वाढदिवसाचे खरे गिफ्ट असेल. कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन युवकांना जोडावे आणि वैचारिक समृद्धीसाठी पुस्तके भेट देऊन एक नवीन आदर्श निर्माण करावा."
— प्रदीप गारटकर
टिप्पण्या