इंदापूर: वाढते शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे नामशेष होत चाललेल्या चिमण्यांच्या संवर्धनासाठी इंदापूर नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. २० मार्च 'जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून श्री.भरतशेठ शहा , नगराध्यक्ष नगरपरिषद इंदापूर सर्व पदाधिकारी आणि विविध वृक्षप्रेमी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहकार्याने विविध पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत चिमण्यांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी शाळेच्या परिसरात आणि शहराच्या विविध भागात कृत्रिम घरटी बसविण्यात आली. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी दाणा-पाणी पात्रांची व्यवस्था करण्यात आली. तसेच, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपस्थित नागरिकांना व विद्यार्थ्यांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.
"चिमणी हा आपल्या निसर्गचक्राचा महत्त्वाचा दुवा आहे. चिमण्यांचे संरक्षण करणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे."
सामूहिक सहभागातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
यावेळी वृक्षप्रेमी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्या प्रतिष्ठानचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, वर्षभर पक्ष्यांची काळजी घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
टिप्पण्या