सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात उदयगिरी सोशल फाउंडेशन व नाना दाते मित्र परिवारातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी वाल्हे ग्रामपंचायत नजीक शाहू फुले आंबेडकर अभ्यासिकेच्या सभागृहासमोर वृक्षारोपण करूनच या सन्मान सोहळ्याला सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमात जेजुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दिपाली पवार यांसह लेखिका राधिका घोरपडे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे विधितज्ञ प्रिया दरेकर माय मराठी संघाच्या कल्पना शेरे माजी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते तसेच दिपाली नलावडे धनश्री कसेकर गीता नांगरे आदी महिलांना विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ सामाजिक कार्यकर्ते नाना दाते उदयगिरी फाउंडेशनचे शिवशंकर मोरे सचिन म्हसे तसेच सतीश पवार असलम नदाफ दिगंबर दाते आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन दुर्गाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्वप्नील बरकडे यांनी मानले.
टिप्पण्या