मुख्य सामग्रीवर वगळा

लोकनेते प्रदीप (दादा) गारटकर मित्र परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे उत्साहात आयोजन सलग ३६ वर्षांची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम

इंदापूर:- जनसामान्यांचे नेते श्री. प्रदीप (दादा) गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, 'प्रदीप (दादा) गारटकर मित्र परिवारा'च्या वतीने यावर्षीही पवित्र रमजान महिन्यानिमित्त भव्य 'रोजा इफ्तार' पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या ३६ वर्षांपासून सालाबादप्रमाणे ही परंपरा अविरतपणे सुरू असून, या कार्यक्रमातून सर्वधर्मसमभावाचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.मुस्लिम समाजाला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन 13/3/2026. शुक्रवार रोजी करण्यात आले इफ्तार पार्टी आयोजनाचे यावर्षी 36 वे वर्ष होते यावेळी मोठ्या प्रमाणावर इंदापूर शहर तथा तालुक्यातील मुस्लिम समाज उपस्थित होता इंदापूर शहरातील सर्व 14 मशिदीचे 18 मौलाना सहाब यांचा मा. प्रदीप (दादा) गारटकर यांच्या हस्ते येतोचित असा सन्मान (गुलपोशी) करण्यात आला 
 राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतानाही, गारटकर मित्र परिवाराने गेल्या साडेतीन दशकांपासून ही धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासली स्थानिक भागातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि रोजेदार मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. केवळ मुस्लिम समाजच नव्हे, तर सर्व धर्मीय नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना प्रदीप दादा गारटकर म्हणाले की, "रमजानचा महिना हा त्याग, संयम आणि प्रार्थनेचा महिना आहे. समाजात शांतता आणि प्रेम टिकून राहावे, हीच आमची भावना आहे. गेल्या ३६ वर्षांपासून आम्ही या इफ्तारच्या माध्यमातून जो प्रेमाचा धागा विणला आहे, तो दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे."
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्र परिवारातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. रोजा सोडल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला आणि देशाच्या प्रगतीसाठी व शांततेसाठी दुवा (प्रार्थना) करण्यात आली,यावेळी प्रामुख्याने इंदापूर नगरीचे विरोधी पक्ष नेते अनिल (अण्णा) पवार, नगरसेवक गणेश (महाराज) राऊत, नगरसेवक सुधाकर (मामा) ढगे, मा. उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे, मा. नगरसेवक अनिल राऊत, इम्रानभाई शेख, वसीमभाई शेख, वसीमभाई बागवान, मुन्नाभाई बागवान, साबीर भाई कुरेशी, गोरख (भाऊ) पवार, रोहित (बंडा) पाटील, अक्षय (आशु) गानबोटे, आनंद (गोटूभाऊ) मखरे, शुभमभाऊ मखरे, आझादभाई पठाण, अशपाकभाई इनामदार, महेशभाऊ जठार, सद्दामभाई बागवान, रोहन सूर्यवंशी, सोनूभाई सय्यद, अक्षय शिंदे, निवासजी घोलप, मयूर ढावरे, चंदू सोनवणे, प्रकाश अडसूळ, गुड्डू मोमीन, समद सय्यद, तोसीफ बागवान, मौलाना समीर देशमुख, तसेच मुस्लिम समाजातील युवक, ज्येष्ठ आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अहेमदरजा (तशुभाई) सय्यद यांनी केले!
**********************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...