रमजान महिन्याचे औचित्य साधून माजी आमदार संजय चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील शाही सुन्नी मशिदीत सालाबादप्रमाणे रोजा इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लीम बांधवांसह महिला वर्गाने देखील रोजा इप्तार पार्टीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याने मस्जिद परिसर अक्षरशः गजबजून गेला होता.
यावेळी संजय जगताप मित्र परिवारातर्फे मुस्लीम समाजातील उपवास धारकांना रोजा इप्तारीसाठी सरबत मिठाईसह फळांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर मगरीबची नमाज अदा झाल्यावर रोजा इप्तार पार्टी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आल्याने मुस्लीम समाजातआनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
अशातच जातीय सलोखा अबाधित रहावा तसेच मित्रत्वाची भावना देखील वाढली पाहिजे या उद्देशाने माजी आमदार संजय जगताप मित्र परिवाराकडून पुरंदर हवेलीतील जवळपास सर्व मशिदीत इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान यांनी दिली.
या प्रसंगी मुस्लिम समाजाचे चांदभाई इनामदार आरिफ आतार आयुब इनामदार अरबाज नदाफ शौकत शेख आयान आतार जमिल शेख राजू इनामदार अस्लम शेख अक्रम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या