मयुर हाईट्स मुलाण पट्टा परिसरात रंगणार 'शिरखुर्मा पार्टी'चा गोडवा; आझम फाउंडेशनचा पुढाकार - अहेमदरजा सय्यद
इंदापूर:- रमजान ईदचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, सामाजिक सलोखा आणि आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी आझम फाउंडेशनच्या वतीने उद्या, शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी भव्य शिरखुर्मा पार्टी'चे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फाउंडेशनने परंपरेनुसार या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम मुलाणपट्टा येथील जुम्मा मशिदी शेजारी, मयूर हाईट्स अपार्टमेंट येथे पार पडणार आहे. शनिवार सकाळी ११:०० वाजल्यापासून शिरखुर्मा पार्टीला सुरुवात होईल.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आझम फाउंडेशनचे अध्यक्ष अहेमदरज (तशुभाई) इक्बाल सय्यद आणि उपाध्यक्ष इमरानभाई अब्दुलहक शेख आहेत. फाउंडेशनच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आणि ईदचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"रमजान ईदनिमित्त आयोजित ही शिरखुर्मा पार्टी केवळ गोड मेजवानी नसून, ती आपापसातील प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याचे एक माध्यम आहे," असे मत अहेमदरजा सय्यद
आयोजकांनी व्यक्त केले आहे..
टिप्पण्या