मुख्य सामग्रीवर वगळा

मुख्यमंत्र्यांसमवेत साखर उद्योगातील विविध घटकांच्या अडचणीसंदर्भात सोमवारी मुंबईत बैठक -हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि. 18/3/26
                                                 राज्यातील साखर उद्योगातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार आदी विविध घटकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे मुंबईत सोमवारी (दि. 23 ) आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणी जाणून घेऊन सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली.
    या बैठकी संदर्भात माहिती देताना हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, “सामाजिक-आर्थिक उद्योग” म्हणून विकसित झाला आहे. साखर कारखाने हे फक्त उत्पादन केंद्र नसून ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. मात्र बदलत्या काळात साखर कारखानदारी समोरील अडचणी वाढत असून त्यामुळे सुमारे 50 लाख ऊस उत्पादक शेतकरी, सुमारे 1.5 लाख साखर कामगार, 10 लाख ऊस तोडणी मजूर आदी अनेक घटक अडचणी सापडले आहेत. राज्यात साखर उद्योगाची सुमारे रु. 60000 कोटींची आर्थिक उलाढाल असून, शासनास मोठा महसुल मिळत आहे.
   राज्यातील साखर उद्योगामध्ये आर्थिक तरलते अभावी सध्या विविध घटकांची रू. 10000 कोटीहुन अधिक देणी प्रलंबित आहेत. त्यामध्ये शेतक-यांची एफ.आर.पी.ची रक्कम देणे, साखर कामगार पगार, तोडणी व वाहतूक मजूरी, व्यापाऱ्यांची देणी यांचा समावेश आहे. तसेच या व्यतिरिक्त विविध बँकाचे रु. 15000 कोटींचे मुदती कर्ज आणि खंळते भांडवली कर्ज प्रलंबित असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
       राज्यातील साखर साखर कारखानदारी समोर सध्या ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार व ऊस तोडणी मजुरांची देणी देणे, बँकांकडील कर्जांचे पुनर्गठन करणे, पुढील हंगामासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देणे, सहवीजनिर्मितीचे अनुदान चालु ठेवणे व बिले मिळणे, पाणीपट्टी दरवाढ आदी राज्य सरकारशी संबंधित विषयांबरोबरच बरोबरच, केंद्र सरकारकडील साखरेची एम.एस.पी. वाढविणे, साखर कारखान्यांकडील इथेनॉलचा कोटा वाढविणे, इथेनॉलची दरवाढ करणे आदी विविध विषय असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत बैठकीत या सर्व विषयांवरती चर्चा होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
       ते पुढे म्हणाले, मुंबईमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे उपस्थितीमध्ये राज्यातील साखर उद्योगातील अडचणी संदर्भात राज्यस्तरीय बैठक दि. 4 मार्च रोजी झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. साखर उद्योगातील काही मागण्या ह्या केंद्र सरकारची संबंधित आहेत. यामध्ये साखरेची एम.एस.पी. प्रति किलो रू.41 करावी, बी-हेवी मोलॅसिस व उसाचा रस या पासूनच्या इथेनॉलच्या दरामध्ये वाढ कारावी, इथेनॉलचा कोटा वाढवून द्यावा, या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यावी, अशी विनंती या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येईल, अशी माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 
•चौकट:-
केंद्र व राज्य सरकारच्या मदतीची गरज- हर्षवर्धन पाटील 
-------------------------------
सध्या साखर उद्योग अडचणीत असल्याने या संदर्भात दिलासादायक उपाययोजना तात्काळ राज्य व केंद्र सरकारकडून होणे अपेक्षित आहेत. अन्यथा आगामी सन 2026-27 च्या ऊस गळीत हंगामामध्ये राज्यातील जवळपास निम्मे साखर कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत, अशी आजची स्थिती दिसत आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, साखर कामगार व ऊस तोडणी मजूरांच्या हाताला काम आदी समाजातील विविध घटकांचे दायित्व हे पर्यायाने राज्य सरकारकडे येऊ शकते, असे मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
_______________________
फोटो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...