राजकीय चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात काँग्रेस कमिटीकडून गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड दरवाढ तसेच गॅस वितरण व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन व राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून आठवडे बाजाराचे औचित्य साधून येथील शहीद शंकर शिंदे चौकात शांततापूर्ण व संविधानात्मक मार्गाने आंदोलनास सुरवात करण्यात आली .या दरम्यान युवा नेते सुनील असवलीकर प्रा. सचिन दुर्गाडे यांसह काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे सेवा दलाचे बापूसाहेब मोकाशी सामाजिक कार्यकर्ते ऍड. फत्तेसिंग पवार अतिश जगताप तसेच ऍड. किरण कुमठेकर माऊली बोराडे सूरज जगदाळे यांसह आदी कार्यकर्त्यांनी गॅस व शेती खतांची झालेली दरवाढ तसेच राज्य शासनाने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी ही अक्षरशः फसवी असल्याचा आरोप करत केंद्र तसेच राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
याप्रसंगी धनंजय ताकवले सतीश पवार दत्तात्रेय राऊत रमजान आतार गुलाब कुमठेकर दत्तात्रेय पांडकर पोलीस हवालदार भाऊसाहेब भोंगळे संतोष वाल्हेकर यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या