कर्मयोगी सह.साखर साखर कारखान्याची ऊसाची बिले ओंकार शुगर युनिट ने थकवली; इंदापूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट, बळीराजा मेटाकुटीला,
इंदापूर: कर्मयोगी सहकारी साखर कारखाना संचलित आणि बाबूराव बोत्रे यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या ओंकार शुगर युनिटने शेतकऱ्यांच्या ऊसाची बीले वेळेवर न दिल्याने इंदापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली.
ऐन गुडीपाडव्याच्या सनाच्या काळात हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, असून, याचा थेट परिणाम इंदापूरच्या बाजारपेठेवर झाला आहे. ग्राहकांअभावी बाजारपेठेत सध्या पूर्णपणे 'शुकशुकाट' पाहायला मिळत आहे.लोक म्हणतात खोकला गेला आणि दुखणं आलं, शेतकऱ्यांची अवस्था बिकट,झाली,
उन्हाळ्याची चाहूल लागत असताना आणि पुढील पिकांच्या नियोजनासाठी पैशांची गरज असताना, हक्काचे ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींच्या डिलिव्हरी साठी दवाखान्यात भरायला पैसेच नाहीत, असुन अडचण नसून खोळंबा हक्काचा पैसा मिळत नसल्याने बापाला सावकारांच्या घराचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली आहे,फायनान्स चे हप्ते आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. अनेक शेतकऱ्यांनी "कारखाना प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत, पण खात्यावर पैसे जमा होत नाहीत," अशी तक्रार केली आहे.
जारपेठेवर मंदीचे सावट इंदापूरची बाजारपेठ मुख्यत्वे शेतीवर आणि विशेषतः साखर कारखान्यांच्या 'पेमेंट'वर अवलंबून असते. मात्र, ओंकार शुगरकडून बिले रखडल्याने:
कापड दुकाण, किराणा दुकान आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे.
शेतकरी फक्त गरजेच्या वस्तूंचीच खरेदी करत असल्याने व्यापारी वर्गही चिंतेत आहे.हॉटेल आणि इतर पूरक व्यवसायांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे.
"शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे अडकल्यामुळे ग्रामीण अर्थचक्र थांबले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येत नाही, तोपर्यंत बाजारपेठेत चैतन्य येणार नाही."
— स्थानिक व्यापारी, इंदापूर
बाबूराव बोत्रे यांनी कारखाना चालवायला घेतल्यावर शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आता बिले रखडल्याने व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक युनिट चालवणारे बाबूराव बोत्रे,कर्मयोगी सह.साखर कारखान्याचे उसाचे बील देण्यास का टाळाटाळ करीत आहेत, का पुढील वर्षांत गळीत हंगाम चालूच करायचा नाही काय.?जर लवकरच बिले अदा केली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. आशी सामान्य जनतेत चर्चा आहे,
********************?,,
हि बातमी काॅफी केल्यास काॅफीराईट चा गुन्हा दाखल होऊ शकतो
टिप्पण्या