मुख्य सामग्रीवर वगळा

नितीन गडकरी दि.10 एप्रिलला तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार- हर्षवर्धन पाटील-

नितीन गडकरी दि.10 एप्रिलला तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार- हर्षवर्धन पाटील
-
इंदापूर : प्रतिनिधी दि.28/3/26
                                               संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गा (राष्ट्रीय महामार्ग 965 जी ) ची आपण स्वतः येऊन पाहणी करून आढावा घ्यावा, अशी विनंती केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर येथे भेटीत आज शनिवारी (दि. 28) केली. त्यास तात्काळ होकार देत ना.नितीन गडकरी हे पुढील महिन्यामध्ये दि. 10 एप्रिल रोजी संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणेसाठी येणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
           नागपूर येथे ना.नितीन गडकरी यांची हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेऊन संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या अपूर्ण व व निकृष्ट कामांबद्दल चर्चा केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांचेकडे पालखी मार्गावरील ठिकठिकाणीचे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बाह्य वळण मार्ग, इंदापूर ते माळीनगर पालखी मार्ग रस्ता यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. 
      देहू ते पंढरपूर पालखी मार्गावरील जंक्शन उड्डालपूल, गोतोंडी उड्डाणपूल, निमगाव केतकी बायपास, वडापुरी उड्डाणपूल, वकीलवस्ती भुयारी मार्ग, बावडा बाह्यवळण रस्ता ही अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करणे तसेच इस्टिमेट प्रमाणे वृक्षारोपण, झाडे, रस्ता दुभाजकांची कामे, स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक आदी कामे ठीकठिकाणी झालेली नाहीत. तसेच अनेक ठिकाणी गटारीची कामे झालेली नसल्याने अथवा अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर कामे इस्टिमेट प्रमाणे कामे पूर्ण करण्यात यावीत तसेच कामे अपूर्ण असताना सुरू असलेली टोल वसुली आदी अनेक विषयांवर यावेळी हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांचेशी चर्चा झाली. यावेळी ना.नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पालखी मार्गाची कामे तातडीने पूर्ण करणे संदर्भात आदेश दिले तसेच कामे अपूर्ण असताना टोल कसा काय लावला या संदर्भातही अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. दरम्यान, या भेटीत नितीन गडकरी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची इथेनॉल यासंदर्भातही चर्चा झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...