इंदापूर :- टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा, यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.इंदापूर तालुक्यातील सर्वच गावातील जनतेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला,विविध भागात अबालवृध्द चौकाचौकात मोठ्या स्क्रिनवर मॅच पाहण्याचा आनंद घेत होते,
हि मॅच पाहतानाचा आनंद गगनात मावत नव्हता,आपण जिंकणारच आसे सगळेच बोलत होते,खेळाडूंनी त्यांची इच्छा पुर्ण केली,सलाम त्यांच्या कार्याला,आसे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा,म्हणाले की, आपल्या संदेशात म्हणाले की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.या ऐतिहासिक विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला आहे.शिवसृष्टी न्यूज शी बोलताना नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा म्हणाले की,या उल्लेखनीय यशाबद्दल संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा,यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात अधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.
टिप्पण्या