उजनी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी, हक्कासाठी आरपारची लढाई; निलेश देवकर यांचा सुर्लीत एल्गार
"उजनी धरणामुळे सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला असला, तरी ज्यांच्या जमिनी या धरणात गेल्या, तो धरणग्रस्त शेतकरी आज ५० वर्षांनंतरही न्याय आणि हक्कासाठी वणवण फिरत आहे. त्यातच भर म्हणून जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांनी 17 जून 2019 व 8 ऑक्टोबर 2025 रोजी केलेल्या शासन निर्णयामुळे धरणग्रस्त भागातील शेतकरी व मच्छीमार यांच्यावर फार मोठा अन्याय होऊन यांना उपासमारीचे वेळ येणार आहे
आता केवळ निवेदने देऊन थांबणार नाही, तर धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आरपारची लढाई लढली जाईल," असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देवकर यांनी दिला.
माढा तालुक्यातील सुर्ली येथे आयोजित 'उजनी धरणग्रस्त शेतकरी मेळाव्यात' ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी परिसरातील शेकडो धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते..
टिप्पण्या