मुख्य सामग्रीवर वगळा

Mumbai Coastal Road: जय हो बंद! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील )
मुंबईमधील कोस्टल रोडवरती मुंबई महापालिकेने सुरु केलेला अनोख्या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी होत्या. रस्त्यावरून गाडी गेल्यानंतर वाजणाऱ्या 'जय हो' या गाण्याच्या धूनमुळे लोकांना होणारा त्रास आता कमी होणार आहे.   

मुंबईत नुकताच सुरू झालेला ‘मेलोडी रोड’ हा अनोखा प्रकल्प
सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी
सततच्या आवाजामुळे रहिवाशांच्या तक्रारी
 
मुंबईत नुकताच सुरू झालेला ‘मेलोडी रोड’ हा अनोखा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी आला होता. या प्रकल्पाचं बाकीच्या लोकांकडून कौतुक झालं असलं तरी तिथल्या रहिवाशांना त्रास होत होता. पंरतु आता मुंबई येथील कोस्टल रोडवर तयार करण्यात आलेल्या या म्युझिकल रस्त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होऊ लागल्याने महापालिकेला तो तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाचं रहिवाशांकडून स्वागत करण्यात आलं आहे. 
‘मेलोडी रोड’मुळे वाढला आवाजाचा त्रास
नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गावर तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरून वाहनं ठराविक वेगाने गेली की ‘जय हो’ गाण्याची धून ऐकू येत होती. सुरुवातीला हा प्रयोग आकर्षक वाटला, पण हाच सततचा आवाज काही दिवसांतच डोकेदुखी ठरला. ब्रिच कँडी परिसरातील रहिवाशांनी विशेषतः सकाळी आणि रात्री होणाऱ्या आवाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. सततच्या ध्वनीमुळे घरात शांतता राहत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
रहिवाशांची तक्रार, महापालिकेची दखल
या भागातील सुमारे 650 हून अधिक कुटुंबांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, “खिडक्या उघडणंसुद्धा अवघड झालं आहे. सततचा आवाज त्रासदायक ठरत आहे.” या वाढत्या विरोधामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत हा ‘मेलोडी रोड’ सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
तक्रारींना प्राधान्य देत हा निर्णय
महापालिकेच्या प्राथमिक तपासणीत आवाजाची पातळी नियमांमध्ये असल्याचं दिसून आलं असलं, तरी नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. आता तज्ञांकडून सविस्तर ध्वनी अभ्यास केला जाणार आहे. आता विशेषतः रात्रीच्या वेळेतील परिणाम तपासले जातील. भविष्यात हा रस्ता फक्त विकेंड किंवा विशेष प्रसंगी सुरू ठेवण्याचा पर्यायही विचारात घेतला जात आहे. 
परदेशात यश, मुंबईत आव्हान
‘मेलोडी रोड’ ही संकल्पना जपान, हंगेरी आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्ये यशस्वी ठरली आहे. मात्र, दाट लोकवस्ती आणि सततची वाहतूक असलेल्या मुंबईत असा प्रयोग राबवताना वेगळ्या अडचणी समोर येत असल्याचं स्पष्ट झालं.
प्रकल्पाची माहिती
11 फेब्रुवारी रोजी सुमारे 6 कोटी रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात आला होता.,आता रहिवाशांच्या विरोधानंतर हा प्रकल्प पुढे कशा स्वरूपात सुरू राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकूणच, ‘मेलोडी रोड’ हा आकर्षक प्रयोग असला तरी नागरिकांच्या6नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर त्यात बदल करणे किती गरजेचे आहे, हे या प्रकरणातून दिसून येत आहे. याचा अर्थ अभ्यासपूर्ण प्रकल्प राबवून 6कोटी पाण्यात घालवले भुगतान जनतेच्या खिशातून केले जाणार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...