मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

 कोरोना विषाणूजन्य संसर्गाशी लढणाऱ्या पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षा कवच मिळावे -हाजी एम. डी. शेख  इंदापुर:कोरोना विषाणूजन्य संसर्गाशी लढणाऱ्या पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षा कवच मिळावे : हाजी एम. डी. शेख संपादक दै.बंधूप्रेम,अध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ,विषाणूजन्य संसर्गाशी लढणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष हाजी एम.डी.शेख, सेक्रेटरी अरुणकुमार मुंदडा, कोषाध्यक्ष वाय. ए. सिद्दिकी, पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे. यासंदर्भात लक्ष्मी वैभव न्युज संपादक विलासराव गाढवे,व शिवसृष्टी न्युज संपादक धनंजय कळमकर यांच्याशी बोलताना हाजी.एम. डी. शेख म्हणाले, दि. 25 मार्च 2020 पासूनदेशातलॉकडाऊन असून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोव्हीड 19 ही राष्ट्रीय आपत्ती आहे. केंद्र सरकार त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहे मात्र ते अपुरे आहेत. मात्र राज्य सरकारनेस्वखर्चातून राज्यातील ...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

शिरसोडी येथील मायलेकींवर यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी केले स्वागत इंदापुर: शिरसोडीतील मायलेकिंना इंदापूरात यशस्वी उपचार मिळाल्याने अवघ्या १२ दिवसात झाल्या कोरोनामुक्त :- माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे शिरसोडी (इंदापुर) मायलेकींवर यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे सर यांचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी केले स्वागत इंदापूर तालुक्यात शिरसोडी येथे मुंबई वरून आलेल्या मायलेकींचा १७ मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यावर इंदापूर येथील उपचारादरम्यान अवघ्या १२ दिवसात ठणठणीत झाल्या आहे. इंदापूर शहरा नजिक असलेल्या कोव्हिड केअर सेंटर मध्ये ह्या मायलेकिंवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आरकिले व संपूर्ण कोव्हिड १९ च्या टीमने यशस्वी उपचार केल्याने मायलेकी कोरोनामुक्त झाल्या. व पोंडकुलवाडीचे  दोन कोरोना रुग्ण लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन स्वतः च्या घरी जातील असे डॉक्टरांनी सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे सर व संपूर्ण...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती  विचारमंथन ग्रुपच्या वतीने राधिका हॉल मध्ये साजरी    इंदापुर:राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन इंदापूर विचारमंथन ग्रुपच्या वतीने राधिका हॉल येथे साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या अंकिताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, सोनाई परिवाराच्या वतीने डॉ. श्रद्धा काळे यांना पीपीई किट अंकिताताई पाटील यांच्या हस्ते दिले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपर आधारित  सोनाली चोरमले यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमासाठी उपस्थित इंदापूर विचार मंथनचे मार्गदर्शक अरविंद (तात्या) वाघ, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती पांडुरंगतात्या मारकड, प्रा. कृष्णाजी ताटे सर आरपीआयचे नेते शिवाजीराव मखरे, बारामती लोकसभा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा. अशोक मखरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, वंचितचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, विशालजी चव्हाण, नितीनजी आरडे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, मा.नगरसेवक अविनाश मखरे, नवनिर्वाचित नगरसेवक द...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

पोलीस, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी -कर्मचारी व आरोग्य सेवक सेविकांचा सन्मान करावा- अंकिता हर्षवर्धन पाटील इंदापुर;पोलीस, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी -कर्मचारी व आरोग्य सेवक सेविकांचा  सन्मान करावा- अंकिता हर्षवर्धन पाटील, पोलिस, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी - कर्मचारी व आरोग्य सेवक-सेविका हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांचे  रक्षणासाठी काम करत आहेत. . शासनाने त्यांचा मान सन्मान करावा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करावा असे जिल्हा परिषद सदस्या  अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर पोलिस स्टेशन यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी आपले मत व्यक्त केले.        कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी-अधिकारी व कुटुंबियांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   रक्‍तदान शिबिरास भेट देऊन पोलीस बंधू-भगिनी सोबत संवा...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नगराध्यक्षाअंकिता मुकुंद शहा यांनी केलेअभिवादन इंदापुर:राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नगराध्यक्षाअंकिता मुकुंद शहा यांनी केलेअभिवादन इंदापुर नगरपालिकेच्या धडाकेबाज नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार  यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले,  त्या वेळी आमच्या शी बोलताना त्या  म्हणाले की अहिल्यादेवींचा जन्म  ३१ मे. इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला.अहिल्यादेवी होळकर  एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते, आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला. "ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्यादेवी होळकर  या  स्त्रियांमध...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रक्तदान करून सरडेवाडी करांनी केले अभिवादन -अभिजीत तांबिले  इंदापुर: तालुक्यातील सरडेवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते  या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांच्या  हस्ते करण्यात आले,  कोरोना सारख्या  महामारी मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला रक्ताची आवश्यकता भासत आहे.  आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेने कोरोणा च्या महासंकटा ला लढा देण्यासाठी रक्ताची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी रक्त दान करण्याचे आवाहन केले आहे आज सरडेवाडी मधील युवकांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे  औचित्य साधून सोशल डिस्टन्स ठेवून मास्कचा  वापर करून तसेच प्रशासनाचा नियम मोडणार नाही याची दक्षता घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले या सर्व तरुणांनी घेतलेला छोटासा उपक्रम खूप महत्त्वाचा आणि समाजोपयोगी आहे याचा आदर्श येथील पंचक्रोशीत...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन इंदापुर: येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन इंदापूर येथील जुन्या कोर्टासमोर असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले.    यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, महेंद्र रेडके, पोपट पवार, नगरसेवक कैलास कदम, दादा पिसे, बापू जामदार, गणेश महाजन, रघुनाथ राऊत, अविनाश कोथमिरे, गोरख शिंदे,ललेंद्र शिंदे, प्रशांत उंबरे, आनंद मखरे, अर्शद सय्यद उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

ग्रामीण भागातील सर्वच व्यवसाय चालू करणे साठी शासनाने परवानगी देणे गरजेचे - हर्षवर्धन पाटील                   इंदापुर:नागरिकांची आता कोरोनासह  जीवन जगण्याची मानसिकता झालेली आहे. अनेक व्यवसाय सध्या बंद असल्याने नागरिक अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे शासनाने महानगरपालिका क्षेत्रात वेगळा निर्णय घेऊन, राज्यातील ग्रामीण भागातील सर्वच व्यवसाय हे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करण्याच्या अटीवर चालू करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.30) व्यक्त केले.              राज्यामध्ये लोकडाऊन चालू होऊन सुमारे 69 दिवस होत आहेत,चौथा लॉक डाऊन रविवारी दि.31 मे रोजी संपणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. कोरोना व्हायरसचा संसर्ग  टाळणेसाठी चांगली जागृतता आता नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागात हॉटेल, चहा सेंटर आदी व्यवसाय बंद आहेत. हॉटेल व्यवसाय सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या दुधाला मागणी वाढेल व हजारो कामगारांना काम ...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

विठ्ठलवाडी चे रहिवाशी बसवेश्वर नाथ योगी महाराज यांच्याकडून गोरगरिबांना अन्नधान्य आणि मसाल्या चे वाटप   इंदापुर तालुक्यातील गलांडावाडी नं 2 मोरे वस्ती बोबडे वस्ती गाडे वस्ती येथील गोरगरीब झोपडपट्टी शेतमजूर आणि विहिर खोदणारे गरीब लोक यांना विठ्ठलवाडी चे रहिवाशी बसवेश्वर नाथ योगी महाराज यांच्याकडून  अन्नधान्य आणि थोडेफार मसाले यांचे वाटप करण्यात आले असून या संकटामध्ये त्यांनी गोरगरिबांना फूल नाही पण फुलाची पाकळी याच्या पर्यंत मदत केलेली  आहे आणि आपला खारीचा वाटा निर्माण करून या वस्तीवरील गोरगरीब शेतमजूर यांना अन्नधान्य वाटप केले आहे आशी माहिती बसवेश्र्वरनाथ योगी.महाराज यांनी दिली ..

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

समता सैनिक दलाच्या वतीने शिवभोजन थाळीचे इंदापुर बसस्थानक परिसरात आयोजन इंदापुर: लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या लोकांसाठी समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक पोळ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात हाॅटेल शाकंबरी येथे शिवभोजन मोफत थाळी वाटपाच्या उपक्रमाची आज (दि.२८ मे) सुरुवात करण्यात आली. दोनशे जणांनी उपक्रमाचा लाभ घेतला. दोन दिवस हा उपक्रम चालणार आहे. रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, शहराध्यक्ष अमोल मिसाळ, तानाजीराव धोत्रे,साामाजिक कार्यकर्ते,ललेंद्र शिंदे,प्रकाश पवार,शिवाजीराव मखरे, धनंजय सोनवणे, दिगंबर शिंदे, मच्छिंद्र कांबळे, मोहन शिंदे, महेश स्वामी, महेश सरवदे, युवराज दणाने, गायकवाड मामा,सुनिल गुळीक, सचिन ओव्हाळ आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना अशोक पोळ म्हणाले की, सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी काम करणा-या पुरोगामी सामाजिक संंघटनांचे मातृसंघटन म्हणून समता सैनिक दलाची ओळख आहे.प.पू डाॅ. .बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२७ मध्ये या संघटनेची स्थापना केली आहे.हक्क अधिकार या बरोबरच गरजवंत...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

परप्रांतींच्या जागी स्थानिकांना नोकरी द्या-दुर्वास शेवाळे इंदापुर :तालुक्यातील लोणी देवकर येथील एम.आय.डी.सी. मध्ये जे कामगार काम करत होते, ते निघून गेले आहेत, नवीन कामगार हे स्थानिक घ्यावेत आम्ही त्यांना सहकार्य करू आसे दुर्वास शेवाळे म्हणाले.   शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई  यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये कोराना बिमारी मुळे जे परप्रांतीय कामगार उद्योग धंदे सोडून गावी निघून गेले आहेत, त्यामुळे कंपनीमध्ये कामगारांचा तुटवडा निर्माण होणार आहे. जर आपण आम्हाला लवकर कळविले तर आम्ही तुम्हाला हिंदुस्थान माथाडी ब जनरल कामगार सेनेच्या वतीने तालुक्यातील बेरोजगार लोकांना काम मिळवून देण्यात सहकार्य  करू तसेच तुमच्या कंपनीला  कामगार मिळून जातील  मा. श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जास्तीत जास्त स्थानिक लोकांना काम द्यावे असे मुख्यमंत्री यांनी  सांगितले आहे. आपण कंपनीचे संबधीत मालक व एच आर मॅनेजर आपण विचार विनीमय करून आपल्याला कोणकोणत्या ट्रेड नुसार क...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांच्या मुळे मिळाले दोन जखमींना जिवदान इंदापुर:जिल्हा परिषद मतदार संघामधिल वडापुरी येथे अभिजीत तांबिले हे काही सहकार्यांनी रमजान ईदच्या निमीत्ताने पाच मीनिटे का होईना घरी येऊन जावा असा हट्ट सकाळ पासून केला होता.त्यानिमीत्ताने अभिजीत तांबिले  इंदापूर बायपासच्या रोडच्या दिशेने वडापुरीच्या दिशेने जात असताना अभिजीत तांबिले यांना रोडवरती गर्दी दिसली. जवळ जाऊन गाडी उभी केल्यानंतर दोन मध्य प्रदेशच्या व्यक्तींना एका गाडीने धडक दिल्याने ते दोघे जखमी आवस्थे मध्ये रोडवरती पडले होते.हे दोन्ही व्यक्ती बेडशिंगे येथे घराच प्लास्टर करण्याचे काम करून त्यांच्या घराच्या दिशेने चाले होते.कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रोड वरील काही लोक जखमी व्यक्तींन जवळ जाण्यास टाळत होते. तर काही लोक त्यांना मदत म्हणून ॲब्युलस येण्यासाठी त्यांच्या फोनवरती प्रेयत्न करत होते.येथिल काही लोक आम्हाला म्हणाले दहा ते पंधरा मिनिट झाले काही कोणाला संपर्क होत नाही.आम्ही लगेच सरडेवाडी टोल प्लाझा वरील कर्मचारी निलेश तरंगे यांना काॅल केला व टोल प्लाझाची...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बाभुळगाव येथील सर्व धर्मातील समाजबांधवांना सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक किटचे वाटप कोरोनावर मात करण्यासाठी समाजबांधवांना सोनाईचा मदतीचा हात इंदापुर:तालुक्यातील बाभुळगाव येथील सर्व धर्मातील समाजबांधवांना सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक किटचे वाटप  कोरोनावर मात करण्यासाठी समाजबांधवांना सोनाईचा मदतीचा हात गोर गोरगरीब लोक ज्यांचे हातावरच पोट आहे..त्यांना काम केले तरच खायला भेटणार अशा लोकांचे या कोरोणा रोगामुळे खूप हाल होत असताना कोणी तरी देवाप्रमाने यावे व त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करावी तसचं काहीस आज दिनांक २४ मे 2020 रोजी इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव या गावामध्ये घडले..  आज सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून, प्रविण माने यांच्याहस्ते  जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. प्रशासन आपल्या परीने आपलं कार्य करतच आहे, पण यात आपणही आपली समाजिक बांधलकी समजून आपला वाटा उचलायचा, याच तत्वावर आम्ही सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करत असल्याची माहिती, प्रविण माने यांनी दिली.  आज बाभुळगाव येथे सर्व जातीधर्माचे लोक जमा झाले होते प्रत्य...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मा.ना.हर्षवर्धन पाटील यांनी मानले जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे आभार, खडकवासल्यातून आवर्तन सोडले     इंदापूरःतालुक्यातील शेतीपिके व पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून जलसंपदा विभागाने शनिवार (दि.23) पासून टेल टू हेड या पद्धतीने उन्हाळी आवर्तन सोडले आहे, त्यामुळे पुणे जलसंपदा मंडळातील सर्व अधिकाऱ्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (शनिवार) आभार व्यक्त केले.           हर्षवर्धन पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पुणे जलसंपदा मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यासाठी शेतीसाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडणेची मागणी करून सकारात्मक अशी चर्चा केली होती. खडकवासला साखळीतील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्याने खडकवासला कालव्यातून शेतीसाठी तात्काळ पाणी सोडण्यात यावे,अशी हर्षवर्धन पाटील यांची मागणी होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत 3 दिवसात आवर्तन सोडण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते, याबाबत पाटील यांचा जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा चालू होता. त्यानुसार आवर्तन सुरू केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

शिक्षणातील गुणवत्ता उच्च दर्जाची करायची असले तर नॅक अटळ आहे   -मा.ना.हर्षवर्धन पाटील  इंदापुर:ग्रामीण भागात नॅकमुळे महाविद्यालयांना उर्जा प्राप्त होईल -हर्षवर्धन पाटील ग्रामीण भागातील अनुदानित व विनाअनुदानित संस्थांनी नॅक करणे अत्यावश्क आहे. नॅकला सामोरे जाताना ग्रामीण भागातील महाविद्यालयांना नविन उर्जा प्राप्त होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी केले.      पुढे ते म्हणाले की, शिक्षणातील गुणवत्ता उच्च दर्जाची करायची असले तर नॅक अटळ आहे. तसेच लॉकडाउनच्या काळानंतर शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होणार आहेत. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब आपल्याला करावा लागेल. रुसा, मा. सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण, पुणे विभाग, पुणे व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय नॅक वर आधारित वेबीनार मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.    या वेबीनारमध्ये रुसाचे प्रमुख सल्लागार डॉ. विजय जोशी, वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर, उच्च व तंत्र शिक्षण, पुणे विभाग...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

प्रदीप दादा गारटकर मित्र परिवार यांच्या वतीने रमजान ईदच्या सणासाठी लागणार्या सर्व वस्तुच्या किटचे वाटप. इंदापुर:गेली अनेक  वर्षाची अखंडीत परंपरा रोजा इफ्तार पार्टी ऐवजी कोरनाच्या पाश्वभुमीतुन सोशल डिस्टेंशन्ट चा विचार करून इंदापुर शहरतील मुलाणी पट्टा,मोमीन गल्ली, मणेरी गल्ली, कुरैशी मोहल्ला, कसबा या परीसरातील सर्व मुस्लिम बांधवांना संत रोहिदास महाराज मंदिर येथे मा.श्री.प्रदीपदादा गारटकर (पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी)यांच्या वतीने रमजान ईदच्या सणासाठी लागणार्या सर्व  वस्तुच्या किटचे वाटप.* *मा.श्री.दत्ताञय भरणे (राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य)*  *मा.श्री.यशवंतराव माने (आमदार मोहळ )यांच्या हस्ते करण्यात आले.* *सुरूवातीला रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.* *या वेळी माजी नगराध्यक्ष मा.श्री.विठ्ठल (आप्पा) ननवरे ,मा.श्री.हनुमंत कोकाटे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) मा.श्री.अनिल राऊत (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) प्रा.अशोक मखरे,.दादासाहेब सोनवणे, मा.राकेश गानबोटे(अध्यक्ष रोटरी क्लब...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ईद निमित्त इंदापूर शहरातील मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा साहित्याचे वाटप इंदापुर: श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व शहा मित्रपरिवार, जावेदभाई शेख मित्रपरिवार, सायराभाभी आत्तार सहेली ग्रुप च्या वतीने  रमजान ईद निमित्त इंदापूर शहरातील 590 मुस्लिम कुटुंबांना शिरखुर्मा साहित्याचे किट वाटप करण्यात आले.      मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण अतिशय मोठा असतो. या काळात महिनाभर उपवास (रोजा) केले जातात. ईद दिवशी शिरखुर्मा बनवून ईद साजरी केली जाते. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ने 350, जावेदभाई शेख मित्र परिवाराने 200, सायराभाभी आत्तार सहेली ग्रुप ने 40 शिरखुर्मा साहित्याचे किट वाटप केले. शेवई ,काजू ,बदाम, मनुके, चारोळे, खोबरे, डालडा, खसखस, वेलदोडे, खारीक असे साहित्य या किटमध्ये देण्यात आले.       1985 मध्ये या ट्रस्टची स्थापना स्वातंत्र्यसेनानी कै.नारायणदास शहा, कै. सुरेश शहा,तसेच गोकुळदास (भाई ) शहा यांनी केली. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) शहा हे ट्रस्टचे अध...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

राज्यातील महाआघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले  - मा.ना.हर्षवर्धन पाटील  भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरात भाग्यश्री बंगला येथे महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. या आंदोलनात राजवर्धन पाटील हे सहभागी झाले होते. इंदापूर: राज्य सरकार कोरोनाचे संकट रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे भाग्यश्री निवासस्थानाच्या अंगणात शुक्रवारी (दि.22) महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले. यावेळी युवा नेते राजवर्धन पाटील हेही या आंदोलनात सहभागी झाले होते.              महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील महाआघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे.राज्य सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र बचाओ  आंदोलन प्रसंगी केला.               हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशामध्ये महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वाधिक आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू होऊन 2 महिने  झाले, तरीही को...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

प्रदिप दादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने रमजान ईद निमित्त 786 किटचे शनिवारी दि.(23) ला वाटप इंदापुर:प्रदिप दादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने रमजान ईद निमित्त 786 किटचे शनिवारी दि.(23) ला वाटप  इंदापूर शहरातील तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा ....! माझा गाव माझी माणसं या मानसिकतेतून गेली अठ्ठावीस वर्षांची अखंड परंपरा रोजा इफ्तार पार्टी ऐवजी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंचे 786 किटचे वाटप सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे माननीय श्री प्रदिप दादा गारटकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा यांच्यावतीने शनिवार दिनांक 23/ 5/ 2020 रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वाटप करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे आपले नम्र प्रदिप दादा गारटकर  मित्रपरिवार इंदापूर.  कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे शनिवार दिनांक 23/ 5/ 2019 रोजी किट वाटप करण्याचे ठिकाण आणि वेळ खालीलप्रमाणे सकाळी आठ वाजून 15 मिनिटांनी सरस्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने  (दि.22) सकाळी 11 वा. घराच्या अंगणामध्ये महाराष्ट्र बचाओ   आंदोलन- हर्षवर्धन पाटील          इंदापूर: महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील महाआघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे.राज्य सरकारच्या या  नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि.22) सकाळी 11 वा. घराच्या अंगणामध्ये आयोजित महाराष्ट्र बचाओच्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे गुरुवारी (दि.21) केले .             याप्रसंगी  भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, शहराध्यक्ष शकील सय्यद उपस्थित होते.            हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, देशामध्ये महाराष्ट्रात कोरणा संसर्ग सर्वाधिक आहे. राज्यात सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग दररोज कमी न होता उलट वाढतच चालला आहे, त्यामुळे दररोज अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. सरकार यासंदर...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

डाॅ.राजेश मोरे यांच्या गैरकारभारावर आरोग्य विभागाची कारवाई ; वैद्यकिय अधिक्षक चार्ज ही काढला. इंदापूर:येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.राजेश मोरे यांच्यावर अखेर महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारवाई केली आहे.त्यांच्याकडे असणारा इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकिय अधिक्षक चार्ज आज ( दि.२० मे) काढून घेण्यात आला आहे.  डॉ. राजेश मोरे हे इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकिय अधिक्षक पदी रूजू होते. गेल्या अनेक दिवसांपासून डाॅ.मोरे यांच्याबद्दल नागरिकांमधून आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. ते सातत्याने आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा ठपका नागरिकांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यांच्या कामकाजाबाबत आरोग्य विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडील वैद्यकीय अधिक्षक पदाचा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ चंदनशिवे यांच्याकडे सोपविण्यात असला असल्याबाबत मुंबई येथील आरोग्य सेवा संचालक डाॅ. साधना तायडे यांनी लेखी आदेश दिला आहे.   मंगळवार दि.१९ मे रोजी डाॅ.राजेश मोरे यांनी इंदापूर जवळील...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

लोककलावंतांना कधी ही अंतर देणार नाही: जिल्हा परिषद सदस्य प्रवीण(भैय्या)माने इंदापूर:लोकचळवळ जिवंत ठेवणारे लोककलावंत हे ख-या अर्थाने समाजसुधारक आहेत.त्यांना आपण कधी ही अंतर देणार नाही.त्यांच्या प्रत्येक अडचणीला धावून जावू अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य व सोनाई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रवीण माने यांनी रविवारी (दि.१७) जंक्शन येथे बोलताना दिली.     तालुक्यातील लोककलावंतांना 'सोनाई प्रतिष्ठान' च्या प्रवीण माने यांच्या हस्ते संसारोपयोगी वस्तुंच्या कीटचे वाटप करण्यात आले.त्या वेळी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील शंभर लोककलावंतांना कीटचे वाटप करण्यात आले.   ते पुढे म्हणाले की,कोरोनाच्या संकटात रणरणत्या उन्हात, परिस्थितीचे चटके सहन करत लोककलावंतांना मदत घेण्याची वेळ आली आहे.हे चित्र लवकरच बदलेल.पुढील काळात ज्यावेळी आपली भेट होईल त्यावेळी गालीचा अंथरुन तुमचे आगतस्वागत करण्यात येईल.   बाळासाहेब सरवदे,विजय सरतापे,कव्वाल हासीम नाझा, भिमराव चितारे,नाथा सरतापे या प्रख्यात लोककलावंतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ● प्रसिध्द लोकगीत गायक आनंद शिंदे यां...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मा.ना.हर्षवर्धन पाटील यांना शह देण्यासाठी आ.दतात्रय भरणे यांनी घेतली आढावा बैठक तालुक्यातील सर्व जनतेत चर्चा  इंदापुर: मा.ना.हर्षवर्धन पाटील यांना शह देण्यासाठीच भरणे यांनी तातडीने  आढावा बैठक घेतल्याची चर्चा आहे.   दत्तात्रय भरणे राज्यमंत्री झाले.डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद अपघाताने भरणे यांच्याकडे आले.त्यानंतर भरणे इंदापूर तालुक्यातील मोक्याच्या गावात संसारोपयोगी वस्तुंच्या वाटपाच्या निमित्ताने फोटोपुरते दर्शन देत होते.पालकमंत्री या नात्याने ते बहुतेक काळ सोलापूर जिल्ह्याचे निवासी झाले होते.   मागील आठवड्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सक्रीय झाले. राज्य जिल्हास्तरावरील प्रशासकीय अधिका-यांच्या संपर्कात राहून त्यांनी कोरोना व लाॅकडाऊन बाबत माहिती काढली.जिल्हाबंदी शिथील केल्यानंतर घडणा-या बाबींचा अंदाज आल्यावर पाटील यांनी तालुक्यात पाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.  इंदापुर तालुक्यातील जिल्हा परिषद पुणेआरोग्य व...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांची कोरोना संदर्भात तहसीलदारांशी चर्चा, शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत हर्षवर्धन पाटील   इंदापूर येथे भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना संदर्भात तहसीलदार सोनाली मेटकरी यांचेशी चर्चा केली. इंदापूर:सध्या कोरोना व्हायरसच्या लॉक  डाऊनमुळे आम जनता अडचणीत आहे. त्यामुळे शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, यासंदर्भात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  शुक्रवारी (दि.15) इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांचेशी भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह चर्चा केली.                      याप्रसंगी इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष नानासाहेब शेंडे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, भाजपचे इंदापुर शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी उपसभापती देवराज जाधव, महेंद्र रेडके, उपसभापती संजय देहाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुका भाजपच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सुप...