इंदापूरःतालुक्यातील शेतीपिके व पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून जलसंपदा विभागाने शनिवार (दि.23) पासून टेल टू हेड या पद्धतीने उन्हाळी आवर्तन सोडले आहे, त्यामुळे पुणे जलसंपदा मंडळातील सर्व अधिकाऱ्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (शनिवार) आभार व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पुणे जलसंपदा मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यासाठी शेतीसाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडणेची मागणी करून सकारात्मक अशी चर्चा केली होती. खडकवासला साखळीतील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्याने खडकवासला कालव्यातून शेतीसाठी तात्काळ पाणी सोडण्यात यावे,अशी हर्षवर्धन पाटील यांची मागणी होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत 3 दिवसात आवर्तन सोडण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते, याबाबत पाटील यांचा जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा चालू होता. त्यानुसार आवर्तन सुरू केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले
या आवर्तनाचा लाभ इंदापूर तालुक्यातील बेडसिंग, वडापुरी, गोखळी, तरंगवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी, कौठळी, बळपुडी, लोणी देवकर, व्याहळी,न्ह्यवी, डोंबळवाडी, थोरातवाडी, मराडेवाडी, गोसावीवाडी, रुई, कळस, पिलेवाडी निरगुडे, अकोले, पोंधवडी, मदनवाडी, शेटफळ गढे आदी गावातील शेतीला होणार असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
_______________________________
टिप्पण्या