राज्यातील महाआघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले -मा.ना.हर्षवर्धन पाटील
भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरात भाग्यश्री बंगला येथे महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. या आंदोलनात राजवर्धन पाटील हे सहभागी झाले होते.
इंदापूर: राज्य सरकार कोरोनाचे संकट रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे भाग्यश्री निवासस्थानाच्या अंगणात शुक्रवारी (दि.22) महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले. यावेळी युवा नेते राजवर्धन पाटील हेही या आंदोलनात सहभागी झाले होते.
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील महाआघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे.राज्य सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र बचाओ आंदोलन प्रसंगी केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशामध्ये महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वाधिक आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू होऊन 2 महिने झाले, तरीही कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी न होता वाढतच चाललेला आहे, त्यामुळे दररोज अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत.प्रत्येक कोरोना बाधित रुग्णावर मोफत औषधोपचार वेळेवर करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, मात्र अनेकवेळा रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.कोरोना रुग्णावरती उपचारांमध्ये राज्य सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शासकीय पातळीवर नियोजन व्यवस्थित होत नसल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता त्रस्त असून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
तसेच राज्यात तसेच इंदापूर तालुक्यात जनतेच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगातून गावागावात कामे सुरू करण्यात यावीत. लॉक डाऊनमुळे जनता अडचणीत असल्याने मागणीनुसार तत्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करण्यात यावेत.त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यात संस्थात्मक क्वारंनटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. इंदापूर तालुक्यात राज्यकर्ते कोरोनाचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहेत,असे आंदोलन प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.दरम्यान, इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी भाजपच्या कार्यकर्त्यांना अंगणामध्ये महाराष्ट्र बचाओ आंदोलन उस्फूर्तपणे केले.एकंदरीत तालुक्यामध्ये या आंदोलनास जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला.
______________________________
टिप्पण्या