इंदापुर:राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नगराध्यक्षाअंकिता मुकुंद शहा यांनी केलेअभिवादन इंदापुर नगरपालिकेच्या धडाकेबाज नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले,
त्या वेळी आमच्या शी बोलताना त्या म्हणाले की अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे. इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला.अहिल्यादेवी होळकर एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते, आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.
"ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्यादेवी होळकर या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या . ज्यांच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी या एक महान स्त्री होत्या ,आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले. आसे मत नगराध्यक्षाअंकिता मुकुंद शहा यांनी व्यक्त केले. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार इत्यादी उपस्थित होते
*****************************************
टिप्पण्या