इंदापुर: शिरसोडीतील मायलेकिंना इंदापूरात यशस्वी उपचार मिळाल्याने अवघ्या १२ दिवसात झाल्या कोरोनामुक्त :- माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे
शिरसोडी (इंदापुर) मायलेकींवर यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे सर यांचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी केले स्वागत इंदापूर तालुक्यात शिरसोडी येथे मुंबई वरून आलेल्या मायलेकींचा १७ मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यावर इंदापूर येथील उपचारादरम्यान अवघ्या १२ दिवसात ठणठणीत झाल्या आहे. इंदापूर शहरा नजिक असलेल्या कोव्हिड केअर सेंटर मध्ये ह्या मायलेकिंवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आरकिले व संपूर्ण कोव्हिड १९ च्या टीमने यशस्वी उपचार केल्याने मायलेकी कोरोनामुक्त झाल्या. व पोंडकुलवाडीचे दोन कोरोना रुग्ण लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन स्वतः च्या घरी जातील असे डॉक्टरांनी सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे सर व संपूर्ण कोव्हिड १९ टीमचे मनापासून आभार मानतो. दि.३० मे २०२० रोजी भिमाई परिवाराच्या व बामसेफच्या वतीने माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे व बामसेफ चे कुमार काळे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे सर यांचा सत्कार पुष्पहार, शाल व शक्ती भक्तीची मूर्ती देऊन केला. रुग्णांचे swyab घेणारे रणजीत भोसले यांचे स्वागत करण्यात आले. आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे. इंदापूर तालुका आपल्याला कोरोनामुक्त करायचा आहे. त्या करिता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामा व्यतिरिक्त घराबाहेर नागरिकांनी पडता कामा नये. शासनाने केलेल्या सूचनांचे पालन योग्य रितीने नागरिकांनी करावे असे आवाहन मखरे यांनी केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनखाली काम करणाऱ्या सर्व टीम चे मनापासून आभार. डॉ. अरविंद आरकिले, पंचायत समितीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ मॅडम, डॉ. विनोद राजपुरे, डॉ. सुहास शेळके, डॉ. गार्डे, डॉ. साळुंखे, डॉ. सिंग मॅडम, लॅबच्या पठाण व गायकवाड मॅडम, तसेच राजेश चिकणे, अजय जगताप या सर्व टीमचे भिमाई परिवार व बामसेफच्या वतीने आभार. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, रणजीत भोसले, बामसेफचे कुमार काळे, अॅड.राहुल मखरे, श्रीम. शकुंतला मखरे उपस्थित होते.
टिप्पण्या