इंदापुर: तालुक्यातील सरडेवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांच्या हस्ते करण्यात आले, कोरोना सारख्या महामारी मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला रक्ताची आवश्यकता भासत आहे.
आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेने कोरोणा च्या महासंकटा ला लढा देण्यासाठी रक्ताची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी रक्त दान करण्याचे आवाहन केले आहे आज सरडेवाडी मधील युवकांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे
औचित्य साधून सोशल डिस्टन्स ठेवून मास्कचा वापर करून तसेच प्रशासनाचा नियम मोडणार नाही याची दक्षता घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले या सर्व तरुणांनी घेतलेला छोटासा उपक्रम खूप महत्त्वाचा आणि समाजोपयोगी आहे याचा आदर्श येथील पंचक्रोशीतील युवक घेतील अशी अपेक्षा अभिजीत तांबिले यांनी व्यक्त केले, आणि पुन्हा एकदा सरडेवाडी येथील ग्रामस्थ पदाधिकारी युवक यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी पंचायत समितीचे सदस्य सतीश
पांढरे बळीराम आबा जानकर सतीश आबा चित्राव राजाराम सागर,सिताराम जानकर विठ्ठल देवकर आप्पासाहेब माने अक्षय जाधव सागर शिंगाडे सचिन सलगर सौरभ जानकर स्वप्नील जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले ते आमचे युवक सहकारी सौरभ वाघमारे भानुदास जाधव गणेश कोकरे तसेच येथील पत्रकार असिफभाई शेख किरण जानकर रोहिदास हरणावळ उपस्थित होते.
टिप्पण्या