इंदापुर:लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या लोकांसाठी समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक पोळ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात हाॅटेल शाकंबरी येथे शिवभोजन मोफत थाळी वाटपाच्या उपक्रमाची आज (दि.२८ मे) सुरुवात करण्यात आली. दोनशे जणांनी उपक्रमाचा लाभ घेतला. दोन दिवस हा उपक्रम चालणार आहे. रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, शहराध्यक्ष अमोल मिसाळ, तानाजीराव धोत्रे,साामाजिक कार्यकर्ते,ललेंद्र शिंदे,प्रकाश पवार,शिवाजीराव मखरे, धनंजय सोनवणे, दिगंबर शिंदे, मच्छिंद्र कांबळे, मोहन शिंदे, महेश स्वामी, महेश सरवदे, युवराज दणाने, गायकवाड मामा,सुनिल गुळीक, सचिन ओव्हाळ आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना अशोक पोळ म्हणाले की, सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी काम करणा-या पुरोगामी सामाजिक संंघटनांचे मातृसंघटन म्हणून समता सैनिक दलाची ओळख आहे.प.पू डाॅ. .बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२७ मध्ये या संघटनेची स्थापना केली आहे.हक्क अधिकार या बरोबरच गरजवंतांसाठी दातृत्वाचा हात होवून हे संघटन नेहेमीच उभे राहिले आहे. लाॅकडाऊनमुळे उदरनिर्वाह करणे बिकट झालेल्या लोकांसाठी कर्तव्य म्हणून वरील उपक्रम राबवण्यात आला आहे.
----------------------------------------------------------------
टिप्पण्या