इंदापुर;पोलीस, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी -कर्मचारी व आरोग्य सेवक सेविकांचा सन्मान करावा- अंकिता हर्षवर्धन पाटील, पोलिस, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी - कर्मचारी व आरोग्य सेवक-सेविका हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांचे रक्षणासाठी काम करत आहेत.
. शासनाने त्यांचा मान सन्मान करावा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करावा असे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर पोलिस स्टेशन यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी-अधिकारी व कुटुंबियांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरास भेट देऊन पोलीस बंधू-भगिनी सोबत संवाद साधला. सध्याची परिस्थिती विचारात घेऊन, आपण सर्वांनी देखील रक्तदान करून एक सामाजिक बांधीलकी जपावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
टिप्पण्या