इंदापुर :तालुक्यातील लोणी देवकर येथील एम.आय.डी.सी. मध्ये जे कामगार काम करत होते, ते निघून गेले आहेत, नवीन कामगार हे स्थानिक घ्यावेत आम्ही त्यांना सहकार्य करू आसे दुर्वास शेवाळे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई
यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये कोराना बिमारी मुळे जे परप्रांतीय कामगार उद्योग धंदे सोडून गावी निघून गेले आहेत, त्यामुळे कंपनीमध्ये कामगारांचा
तुटवडा निर्माण होणार आहे. जर आपण आम्हाला लवकर कळविले तर आम्ही तुम्हाला हिंदुस्थान माथाडी ब जनरल कामगार सेनेच्या वतीने
तालुक्यातील बेरोजगार लोकांना काम मिळवून देण्यात सहकार्य करू तसेच तुमच्या कंपनीला कामगार मिळून जातील
मा. श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जास्तीत जास्त स्थानिक लोकांना काम द्यावे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
आपण कंपनीचे संबधीत मालक व एच आर मॅनेजर आपण विचार विनीमय करून आपल्याला कोणकोणत्या ट्रेड नुसार कोणकोणते कामगार लागणार आहेत
ते आम्हाला कळवावे.
जर आपण परप्रांती लोकांची भरती केली गेली
तर त्यामध्ये जर कोणी परप्रांती कामगार भेटले तर हिंदुस्थान माथाडी कामगार सेना व शिवसेना यांच्या तर्फे शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू
आसे निवेदनात हिंदुस्थान माथाडी कामगार सेने चे दुर्वास शेवाळे यांनी म्हटले आहे.
यावेळी निवेदनाच्या प्रती सबंधीताना पाठवण्यात आल्या
टिप्पण्या