इंदापुर:राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन इंदापूर विचारमंथन ग्रुपच्या वतीने राधिका हॉल येथे साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या अंकिताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, सोनाई परिवाराच्या वतीने डॉ. श्रद्धा काळे यांना पीपीई किट अंकिताताई पाटील यांच्या हस्ते दिले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपर आधारित सोनाली चोरमले यांचे व्याख्यान झाले.
कार्यक्रमासाठी उपस्थित इंदापूर
विचार मंथनचे मार्गदर्शक अरविंद (तात्या) वाघ, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती पांडुरंगतात्या मारकड, प्रा. कृष्णाजी ताटे सर आरपीआयचे नेते शिवाजीराव मखरे, बारामती लोकसभा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा. अशोक मखरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, वंचितचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, विशालजी चव्हाण, नितीनजी आरडे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, मा.नगरसेवक अविनाश मखरे, नवनिर्वाचित नगरसेवक दादासाहेब सोनवणे, राष्ट्र सेवा दलाचे गफुरभाई सय्यद, वाल्मीक खानेवाले, प्रकाश पवार, आप्पा माने, विजय इंगुले तसेच इंदापूर विचारमंथनचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माऊली नाचण यांनी केले.
टिप्पण्या