शिक्षणातील गुणवत्ता उच्च दर्जाची करायची असले तर नॅक अटळ आहे -मा.ना.हर्षवर्धन पाटील
इंदापुर:ग्रामीण भागात नॅकमुळे महाविद्यालयांना उर्जा प्राप्त होईल -हर्षवर्धन पाटील ग्रामीण भागातील अनुदानित व विनाअनुदानित संस्थांनी नॅक करणे अत्यावश्क आहे. नॅकला सामोरे जाताना ग्रामीण भागातील महाविद्यालयांना नविन उर्जा प्राप्त होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी केले.
पुढे ते म्हणाले की, शिक्षणातील गुणवत्ता उच्च दर्जाची करायची असले तर नॅक अटळ आहे. तसेच लॉकडाउनच्या काळानंतर शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होणार आहेत. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब आपल्याला
करावा लागेल. रुसा, मा. सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण, पुणे विभाग, पुणे व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय नॅक वर आधारित वेबीनार मध्ये मार्गदर्शन करताना ते
बोलत होते.
या वेबीनारमध्ये रुसाचे प्रमुख सल्लागार डॉ. विजय जोशी, वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर, उच्च व तंत्र शिक्षण, पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ व दयानंद महाविद्यालय सोलापूरचे डॉ. दिपक ननवरे आणि
बृहन् महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी मार्गदर्शन केले.
झुम अॅपद्वारे घेण्यात आलेल्या वेबीनारची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी बेबीनारची संपुर्ण माहिती दिली.
स्वागत नॅकसमन्वयक प्रा. विरेश होळकुंदे यांनी केले.
सुत्रसंचालन सहसमन्वयक प्रा. संदिप शिंदे यांनी केले. या कार्यशाळेमध्ये ग्रामीण भागतील ७० महाविद्यालयातील २०० प्राध्यापक, प्राचार्य व संस्थाचालकांनी सहभाग घेतला.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ऋतिक गायकवाड व स्वप्निल गुणवरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर वेबीनार अतिशय उत्तम झाल्याचे अनेक
सहभागी प्राध्यापकांनी सांगितले.
टिप्पण्या