इंदापुर:जिल्हा परिषद मतदार संघामधिल वडापुरी येथे अभिजीत तांबिले हे काही सहकार्यांनी रमजान ईदच्या निमीत्ताने पाच मीनिटे का होईना घरी येऊन जावा असा हट्ट सकाळ पासून केला होता.त्यानिमीत्ताने अभिजीत तांबिले इंदापूर बायपासच्या रोडच्या दिशेने वडापुरीच्या दिशेने जात असताना अभिजीत तांबिले यांना रोडवरती गर्दी दिसली.
जवळ जाऊन गाडी उभी केल्यानंतर दोन मध्य प्रदेशच्या व्यक्तींना एका गाडीने धडक दिल्याने ते दोघे जखमी आवस्थे मध्ये रोडवरती पडले होते.हे दोन्ही व्यक्ती बेडशिंगे येथे घराच प्लास्टर करण्याचे काम करून त्यांच्या घराच्या दिशेने चाले होते.कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रोड वरील काही लोक जखमी व्यक्तींन जवळ जाण्यास टाळत होते.
तर काही लोक त्यांना मदत म्हणून ॲब्युलस येण्यासाठी त्यांच्या फोनवरती प्रेयत्न करत होते.येथिल काही लोक आम्हाला म्हणाले दहा ते पंधरा मिनिट झाले काही कोणाला संपर्क होत नाही.आम्ही लगेच सरडेवाडी टोल प्लाझा वरील कर्मचारी निलेश तरंगे यांना काॅल केला व टोल प्लाझाची ॲम्बुलन्स माघवण्यास मदत मागितली.काही मीनिटांमध्ये ॲम्बुलस उपलब्ध झाली.सोशल डिस्टन्स ठेवून,मास्क घालून तसेच प्रशासनाचा कोणताही नियम मोडणार नाही याची काळजी घेऊन जखमी अवस्थे मध्ये असलेले दोन्ही व्यक्तींना ॲम्बुलन्स मध्ये घेऊन इंदापूर येथे उपजिल्हा रूग्णालय येथे उपचारासाठी पोहचवले.
आम्ही टोलप्लाझा वरील सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानतो कोरोनाच्या आशा वाढत्या महामरी मध्ये सुध्दा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तसेच आपल्या देशाच्या रक्षणासाठी स्वत:चा व त्यांच्या कुटूंबाच्या काळजीचा विचार न करता सुध्दा सक्षम उभे आहेत.
टिप्पण्या