इंदापुर: श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व शहा मित्रपरिवार, जावेदभाई शेख मित्रपरिवार, सायराभाभी आत्तार सहेली ग्रुप च्या वतीने रमजान ईद निमित्त इंदापूर शहरातील 590 मुस्लिम कुटुंबांना शिरखुर्मा साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण अतिशय मोठा असतो. या काळात महिनाभर उपवास (रोजा) केले जातात. ईद दिवशी शिरखुर्मा बनवून ईद साजरी केली जाते. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ने 350, जावेदभाई शेख मित्र परिवाराने 200, सायराभाभी आत्तार सहेली ग्रुप ने 40 शिरखुर्मा साहित्याचे किट वाटप केले. शेवई ,काजू ,बदाम, मनुके, चारोळे, खोबरे, डालडा, खसखस, वेलदोडे, खारीक असे साहित्य या किटमध्ये देण्यात आले.
1985 मध्ये या ट्रस्टची स्थापना स्वातंत्र्यसेनानी कै.नारायणदास शहा, कै. सुरेश शहा,तसेच गोकुळदास (भाई ) शहा यांनी केली. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) शहा हे ट्रस्टचे अध्यक्ष असून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा आणि इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा तसेच वैशाली शहा या ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या ट्रस्टने तसेच जावेदभाई शेख मित्र परिवार, सायराभाभी आत्तार सहेली ग्रुपने अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
हमीद आत्तार, अल्ताफ पठाण, अशोक चिंचकर, उमेश महाजन यांनी किट साहित्य वाटपासाठी सहकार्य केले.
-------------------------------------------------------------------
टिप्पण्या