इंदापुर:तालुक्यातील बाभुळगाव येथील सर्व धर्मातील समाजबांधवांना सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक किटचे वाटप
कोरोनावर मात करण्यासाठी समाजबांधवांना सोनाईचा मदतीचा हात गोर गोरगरीब लोक ज्यांचे हातावरच पोट आहे..त्यांना काम केले तरच खायला भेटणार अशा लोकांचे या कोरोणा रोगामुळे खूप हाल होत असताना कोणी तरी देवाप्रमाने यावे व त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करावी तसचं काहीस आज दिनांक २४ मे 2020 रोजी इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव या गावामध्ये घडले..
आज सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून, प्रविण माने यांच्याहस्ते जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. प्रशासन आपल्या परीने आपलं कार्य करतच आहे, पण यात आपणही आपली समाजिक बांधलकी समजून आपला वाटा उचलायचा, याच तत्वावर आम्ही सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करत असल्याची माहिती, प्रविण माने यांनी दिली.
आज बाभुळगाव येथे सर्व जातीधर्माचे लोक जमा झाले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व समाधान पाहायला भेटले.
सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आज बाभुळगाव येथे एकूण १५० किटचे वाटप गावकर्यांना सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने मा. प्रविनभैय्या माने, पत्रकार शिवाजी आप्पा पवार, उप सरपंच धनंजय देवकर, माजी सरपंच रामभाऊमामा देवकर, महादेव मिसाळ व इतर प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते कोव्हीड १९ च्या नियमांचे पालन करून वाटप करण्यात आले..विशेष बाब म्हणजे गावातील संभाजी टिपाले महाराज यांनी आपल्या रानातील वांगी व कांदा यांचे वाटप केले..
या कार्यक्रमामध्ये प्रविनभैया माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व तरुण वर्गाला आव्हान केले *आता आपल्या देशातील तरुणांनी हाताला भेटेल ते काम करावे आणि या बेरोजगारीच्या रक्षासास मुळापासून उखडून टाकून आपल्या परिवाराची काळजी घ्यावी..त्यांनी सर्व लोकांना कोरोना ला घाबरून जायची काहीही गरज नाही आपण विनाकारण घराबाहेर पडू नये व काही आवश्यक कामासाठी बाहेर गेले तर घरी आल्यानंतर आवश्यक ती स्वछता करूनच घरात प्रवेश करावा** असे अवाहन केले कोरोना पासून आपण व आपले गाववाले यांना कसे वाचवावे याचे प्रबोधन केले.
याचवेळी गावातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे युवक नेते संजयराव देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोनाई परिवार व प्रविण माने यांचे बाभुळगांवर पहिल्या पासुन भरभरुन प्रेम करतात. व गावावर कोठलेही संकट अाले की, गावाच्या मदतीला धाऊन येतात त्याचाच प्रत्यय रविवारी अाला त्यांनी बाभुळगावला लगेच १५० रेशनकीट दिले व जरी कमी पडले तरी अाजुन देण्याची घोषणा ही केली त्यामुळे गावातील सर्व गावातर्फे संजय देवकर यांनी जाहीर अाभार मानले. तसेच कोरोनाला आपण सर्वजण मिळून पराभूत करू व आपल्या सर्व समाजबांधवांना त्याच्याविरुद्ध लाडण्याच बळ देऊ असे आपले विचार व्यक्त केले..
लॉकडाऊनचा ताण हा सर्वत्रच जाणवत आहे, पण यातही गरजवंतांना मदतीचा हात सदैव सोनाई प्रतिष्ठानने दिला आहे, यात इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावांतून ७००० गरजवंतांना थेट अन्नधान्य किटच्या स्वरूपात मदत पोहचवली, लॉकडाऊनचा थेट परिणाम ज्यांच्या रोजंदारीवर काम करणार्या मजुरावर होतो व इतर सर्वच समाज बांधवांनाही मदत पोहचविण्यात आल्याचे यावेळी माने यांनी सांगितले.
आज बाभुळगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी माजी बांधकाम व आरोग्य सभापती व जिल्हा परिषद सदस्य मा. प्रविणभैया माने
गावातील संजय देवकर, व त्यांचे सर्व तरुण सहकारी यांच्यासह अनेक गोरगरीब लोक उपस्थित होते. यावेळी भविष्यातही अश्याच पध्दतीने सोनाई प्रतिष्ठानचे काम सुरू राहणार असल्याचे प्रविण माने यांनी मनोदय व्यक्त केला.
यावेळी समस्त गोरगरीब समाजबांधवांनी सोनाई प्रतिष्ठान व प्रवीण भैय्या माने यांचे मनापासून जाहीर आभार व्यक्त केले.
टिप्पण्या