इंदापुर:प्रदिप दादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने रमजान ईद निमित्त 786 किटचे शनिवारी दि.(23) ला वाटप
इंदापूर शहरातील तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा ....!
माझा गाव माझी माणसं या मानसिकतेतून गेली अठ्ठावीस वर्षांची अखंड परंपरा रोजा इफ्तार पार्टी ऐवजी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंचे 786 किटचे वाटप सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे माननीय श्री प्रदिप दादा गारटकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा यांच्यावतीने शनिवार दिनांक 23/ 5/ 2020 रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वाटप करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे आपले नम्र प्रदिप दादा गारटकर मित्रपरिवार इंदापूर.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे शनिवार दिनांक 23/ 5/ 2019 रोजी किट वाटप करण्याचे ठिकाण आणि वेळ खालीलप्रमाणे सकाळी आठ वाजून 15 मिनिटांनी सरस्वतीनगर सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी जावायवाडी सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी संत रोहिदास महाराज मंदिर परिसर मुलाणी पट्टा, मोमिन गल्ली, कुरेशी गल्ली, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सावतामाळी नगर दर्गा मस्जिद परिसर ,अंबिका नगर, गणेश नगर, सकाळी दहा वाजता शेख म्होल्ला, शिवाजी चौक खडकपुरा, सकाळी दहा वाजून 15 मिनिटांनी व्यंकटेश नगर, बाबा चौक परिसर याठिकाणी प्रदिप दादा मित्र परिवाराच्या वतीने वाटप करण्यात येणार आहे. सोशल डिस्टंनस पाळून व शासनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करणार आहोत, तरी आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा,
टिप्पण्या