इंदापुर:कोरोना विषाणूजन्य संसर्गाशी लढणाऱ्या पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षा कवच मिळावे : हाजी एम. डी. शेख संपादक दै.बंधूप्रेम,अध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ,विषाणूजन्य संसर्गाशी लढणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष हाजी एम.डी.शेख, सेक्रेटरी अरुणकुमार मुंदडा, कोषाध्यक्ष वाय. ए. सिद्दिकी, पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे. यासंदर्भात लक्ष्मी वैभव न्युज संपादक विलासराव गाढवे,व शिवसृष्टी न्युज संपादक धनंजय कळमकर यांच्याशी बोलताना हाजी.एम. डी. शेख म्हणाले, दि. 25 मार्च 2020 पासूनदेशातलॉकडाऊन असून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोव्हीड 19 ही राष्ट्रीय आपत्ती आहे. केंद्र सरकार त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहे मात्र ते अपुरे आहेत. मात्र राज्य सरकारनेस्वखर्चातून राज्यातील जनतेला कोव्हीड 19 पासून वाचविण्यासाठी तसेच कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत असणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी व पोलिस यांना मृत्यू झाल्यास राज्य शासनाच्यावतीने 50 लाख रुपयांचे सुरक्षाकवच मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना देण्याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.कोरोनापासूननागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक पत्रकारांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देणाऱ्या अनेक योध्यांबरोबरच प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षाकवच मिळाले पाहिजे अशी दुरुस्ती या शासन परिपत्रकात शासनाने करणे गरजेचे आहे. पत्रकारांचा या परिपत्रकात समावेश झाल्यास त्यांना देखील न्याय मिळेल. त्यामुळेकोव्हीड 19 वर मात करताना कोरोना विरोधी युद्धांमध्ये पत्रकारांना शासकीय सुरक्षा कवच देणे ही काळाची गरज आहे.
*****************************************
टिप्पण्या