इंदापूर:लोकचळवळ जिवंत ठेवणारे लोककलावंत हे ख-या अर्थाने समाजसुधारक आहेत.त्यांना आपण कधी ही अंतर देणार नाही.त्यांच्या प्रत्येक अडचणीला धावून जावू अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य व सोनाई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रवीण माने यांनी रविवारी (दि.१७) जंक्शन येथे बोलताना दिली.
तालुक्यातील लोककलावंतांना 'सोनाई प्रतिष्ठान' च्या प्रवीण माने यांच्या हस्ते संसारोपयोगी वस्तुंच्या कीटचे वाटप करण्यात आले.त्या वेळी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील शंभर लोककलावंतांना कीटचे वाटप करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की,कोरोनाच्या संकटात रणरणत्या उन्हात, परिस्थितीचे चटके सहन करत लोककलावंतांना मदत घेण्याची वेळ आली आहे.हे चित्र लवकरच बदलेल.पुढील काळात ज्यावेळी आपली भेट होईल त्यावेळी गालीचा अंथरुन तुमचे आगतस्वागत करण्यात येईल.
बाळासाहेब सरवदे,विजय सरतापे,कव्वाल हासीम नाझा, भिमराव चितारे,नाथा सरतापे या प्रख्यात लोककलावंतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
● प्रसिध्द लोकगीत गायक आनंद शिंदे यांचे जवळचे स्नेही इंदापूरचे लोकगीत गायक बाळासाहेब सरवदे हे राज्यातील अडचणीत असणा-या लोक कलावंतांसाठी मदतीचा हात मिळवून देत आहेत.याच कारणासाठी त्यांनी इंदापूर विचार मंथनचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांना मदतीचे आवाहन केले होते. यासंदर्भात इंदापूर विचारमंथनचे सदस्य असणारे सोनाई उद्योग समुहाचे सर्वेसर्वा दशरथ माने व त्यांचे पूत्र सोनाई प्रतिष्ठानचे प्रमुख प्रवीण माने यांच्याशी वाघ यांनी विचारविनिमय करताच, क्षणाचा ही विलंब न लावता माने पितापुत्रांनी लोककलावंतांना सढळ हाताने मदत करण्याचा निर्णय घेतला.त्यातून जंक्शनचा हा कार्यक्रम संपन्न झाला.●
टिप्पण्या