इंदापुर: मा.ना.हर्षवर्धन पाटील यांना शह देण्यासाठीच भरणे यांनी तातडीने आढावा बैठक घेतल्याची चर्चा आहे.
दत्तात्रय भरणे राज्यमंत्री झाले.डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद अपघाताने भरणे यांच्याकडे आले.त्यानंतर भरणे इंदापूर तालुक्यातील मोक्याच्या गावात संसारोपयोगी वस्तुंच्या वाटपाच्या निमित्ताने फोटोपुरते दर्शन देत होते.पालकमंत्री या नात्याने ते बहुतेक काळ सोलापूर जिल्ह्याचे निवासी झाले होते.
मागील आठवड्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सक्रीय झाले. राज्य जिल्हास्तरावरील प्रशासकीय अधिका-यांच्या संपर्कात राहून त्यांनी कोरोना व लाॅकडाऊन बाबत माहिती काढली.जिल्हाबंदी शिथील केल्यानंतर घडणा-या बाबींचा अंदाज आल्यावर पाटील यांनी तालुक्यात पाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.
इंदापुर तालुक्यातील जिल्हा परिषद पुणेआरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधून दिलेली अनेक गावातील प्राथमिकआरोग्य केंद्र अद्याप तरी उदघाटनाच्या प्रतिकक्षेत आहेत, ते आमदारांना माहिती नाही काय?ती का चालू केली नाहीत हा संशोधनाचा विषय आहे याला जबाबदार कोण?आशी सामान्य जनतेत चर्चा आहे? अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी कमी आहेत, हा प्रश्न फारच गंभीर आहे.
मनरेगाची कामे सुरु करावीत. शिधापत्रधारकांना विनासायास गहू व तांदूळ मिळावा.संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे.या मागण्या शासनदरबारी लावून धरल्या.तहसीलदारांकडे शिष्टमंडळ नेवून चर्चा ही केली.
हर्षवर्धन पाटील सक्रिय झाल्यानंतर,तालुक्यात कोरोना नाही म्हणून खुशमस्क-यांकडून आपली पाठ थोपाटून घेणारे भरणे जाग्यावर आले.बाहेरुन येणारे लोक,वस्तुस्थिती,संभाव्य परिणाम याची जाणीव त्यांना झाली.हर्षवर्धन पाटील यांचे भाजपशी असणारे नाते त्यांना थेट केंद्र सरकारकडे घेवून जाते.यामुळे परत पाटील डोईजड होवू नयेत या एकाच कारणासाठी भरणे यांनी पाटील यांना शह देण्यासाठी ही आढावा बैठक घेतल्याची सर्वत्र चर्चा आहे
या आढावा बैठकीत इंदापूर तालुक्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे सक्तीने विलगीकरण करण्याचे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी (दि.१६ मे) तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.
इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय वसतिगृह व भिगवण ट्रॉमा सेंटर या ठिकाणी संशयित कोरोना रुग्णांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे,अशी माहिती ही त्यांनी या वेळी दिली.
ते म्हणाले की,कोरोना संक्रमणाचा महत्वाच्या टप्पावर आपण आहोत.गावपातळीवर तलाठी,पोलीस पाटील, ग्रामसेवक,कोतवाल यांनी सजग रहाणे गरजेचे आहे.शहरात व गावात आलेल्या बाहेरच्या माणसाची माहिती प्रशासनास कळवण्यात यावी.त्याची तात्काळ दखल घेतली जाईल,असे ते म्हणाले.
टिप्पण्या