इंदापुर: येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन इंदापूर येथील जुन्या कोर्टासमोर असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, महेंद्र रेडके, पोपट पवार, नगरसेवक कैलास कदम, दादा पिसे, बापू जामदार, गणेश महाजन, रघुनाथ राऊत, अविनाश कोथमिरे, गोरख शिंदे,ललेंद्र शिंदे, प्रशांत उंबरे, आनंद मखरे, अर्शद सय्यद उपस्थित होते.
टिप्पण्या