इंदापूर:येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.राजेश मोरे यांच्यावर अखेर महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारवाई केली आहे.त्यांच्याकडे असणारा इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकिय अधिक्षक चार्ज आज ( दि.२० मे) काढून घेण्यात आला आहे.
डॉ. राजेश मोरे हे इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकिय अधिक्षक पदी रूजू होते.
गेल्या अनेक दिवसांपासून डाॅ.मोरे यांच्याबद्दल नागरिकांमधून आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. ते सातत्याने आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा ठपका नागरिकांनी त्यांच्यावर ठेवला होता.
त्यांच्या कामकाजाबाबत आरोग्य विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडील वैद्यकीय अधिक्षक पदाचा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ चंदनशिवे यांच्याकडे सोपविण्यात असला असल्याबाबत मुंबई येथील आरोग्य सेवा संचालक डाॅ. साधना तायडे यांनी लेखी आदेश दिला आहे.
मंगळवार दि.१९ मे रोजी डाॅ.राजेश मोरे यांनी इंदापूर जवळील सी.सी.सी.केंद्रात उपचार घेणा-या मायलेकींना काही शारिरिक चाचण्यांसाठी थेट इंदापूर शहरात फिरवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केवळ चोवीस तासात ही कारवाई झाली.त्यामुळे आरोग्य विभागा कडून लोकभावनेची कदर झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
*******************************************
टिप्पण्या