मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका!

मुंबई प्रतिनीधी :(सतिश वि.पाटील) प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली.  राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, ४ महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्याने घेण्यात येईल. नाशिकमध्ये ५...

नेता असावा तर असा.शेतकऱ्यांनी मागणी करताच काही काही तासातच ट्रान्सफॉर्मर हजर

सरडेवाडी  :-विठ्ठल महाडिक म्हणजे. दिलेला शब्द पाळणारा नेता सरडेवाडी येथील शेतकऱ्यांनी मागणी करताच काही काही तासातच ट्रान्सफॉर्मर (डि पी) बसविला शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दि.६/९/००२५रोजी. ट्रान्सफॉर्मर जळाला होता. शेतकऱ्यांनी वरिष्ठांना तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. शिवनेरी नगर, गायकवाड वस्ती,जाधव वस्ती, देवकाते वस्ती ऐकाड वस्ती,येथील शेतकरी व घरगुती ग्राहक हैराण झाले होते.विठ्ठल महाडिक साहेब यांना कळताच काही तासातच ट्रान्सफॉर्मर डि पी बसला.एक पैसाही न खर्च करता डि पी बसविला त्या मुळे गणेश गायकवाड, सुरेश ऐकाड, सागर गायकवाड, दादा राऊत, सोमनाथ देवकाते,आल्हाबक्ष पठाण,सागर विटकर यांनी दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांचे आभार मानले.

महा किड्सची वैष्णवी कर्चे बुद्धिबळामध्ये तालुक्यात प्रथम

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ  सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नातेपुते येथील महा किड्स सी.बी.एस.ई स्कूल मधील इयत्ता ६ वी मधील विद्यार्थिनी कु.वैष्णवी रवींद्र कर्चे हिने १४ वर्षीय मुलींच्या वयोगटातून तालुका पातळीवर दिमाखदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकविला आहे. यावेळी स्पर्धा स्विस पद्धतीने वयोगट १४ तसेच १७ आणि १९ मध्ये घेतल्या गेल्या. या स्पर्धेत वैष्णवी कचरे हिने एकूण ५ पैकी ४ मॅच जिंकत ३८.२६. पॉईंट्स मिळविल्याने तिची निवड जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.  यावेळी संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक अँड.शिवशंकर पांढरे यांनी तिचा सन्मान केला. याप्रसंगी संस्थेच्या कॉर्डिनेटर विद्या घोगरे क्रीडा शिक्षक रणजित मोहिते व कोमल रणदिवे उपस्थित होते.

*अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सीएससीमध्ये सामंजस्य करार*

* आता लाभार्थ्यांना महामंडळाच्या सेवा सीएससीमध्ये माफक दरात मिळणार * पुणे, दि.१०: (जिमाका वृत्तसेवा): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना सामान्य सेवा केंद्रामार्फत (सीएससी) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात देण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सीएससीचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयामध्ये सामजस्य करार करण्यात आला.  सीएससी हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्वाचे माध्यम आहे, या करारानुसार लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या सीएससी केंद्रावर महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ आणि खर्चामध्ये बचत होणार आहे. येत्या काळात लाभार्थ्याकरिता मोबाईल अॅप व चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रियाअधिक सोपी, पारदर्शक आणि कि...

कै.शिवाजीराव जामदार यांचे दुखःद निधन

 इंदापूर येथील कै.शिवाजीराव गोविंद जामदार, यांचेअल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांचे वय 85,वर्ष होते,त्यांचे पश्चात्ताप पत्नी दोन मुले एक मुलगी, सुना नातवंडे आसा परीवार होता,सामाजिक कार्यकर्ते बापूराव जामदार यांचे ते थोरले बंधु होते,त्यांच्या जाण्याने इंदापूरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

डाॅ.सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर, तालुका प्रतिनिधी, डॉ. संदेश शहा. प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला. त्याचे कौतुक राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटवार यांनी केले. या आरोग्य केंद्राने १०० दिवसात लक्षवेधी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेवून या केंद्राचे विशेष पत्रा व्दारे अभिनंदन केले. त्यामुळे इंदापूर तालुक्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यात झाला. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे असे प्रतिपादन  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.  आरोग्य केंद्र बिजवडी, काटी आणि शेळगावच्या २०० कर्मचाऱ्यांच्या यशोगाथेचा आयुष्मान आरोग्यदूत गौरव सोहळा इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाला. तत्पूर्वी समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निमगाव केतकी येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन सुशोभीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन देखील मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण डोंगरे, देवराज जाध...

*महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा संविधानविरोधी* — ॲड. राहुल मखरे

इंदापूर : प्रतिनिधी           महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा संविधान विरोधी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस ॲड. राहुल मखरे यांनी केले.    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.       पुढे बोलताना ते म्हणाले की, जनसुरक्षा कायदा हा संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे हनन करणारा कायदा आहे. मुलभूत अधिकारांवर गदा आणणारा कायदा संसदेत एकमताने जरी मंजूर झाला तरी सुप्रीम कोर्ट त्या कायद्याला मान्यता देत नाही. कारण लोकशाहीत लोकांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य असते. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मारक असलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा संविधान विरोधी असल्याने त्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला तसेच महायुती सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी ही मागणी त्यांनी केली.        राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य अमोल ...

प्रशासकीय भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देणे व प्रांगणात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे शिल्प बसवा

 इंदापूर:- मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांनी प्रशासकीय भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देणे व प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे शिल्प बसवण्यात यावे. हे निवेदन कार्यकारी दंडाधिकारी मा. स्वाती राऊत यांना देण्यात आले. विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या सुनबाई राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान वाढवावा अशी भावना शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी शिवमती प्रा. जयश्री गटकूळ, कल्पना भोर, रतन पाडुळे, हेमलता बोंद्रे, स्वाती रणसिंग, अॅड. पांडुरंग रायते, प्रमोद देशमुख, अमोल खराडे,  प्रमोद जगताप, उदयसिंह भोसले, राहुल साळुंखे, तुषार घोगरे उपस्थित होते.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा देवकर कालवश

वाल्हे प्रतिनिधी:सिकंदर नदाफ मावडी सुपे ( ता. पुरंदर ) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा विष्णू देवकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.मात्र त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ज्ञानोबा देवकर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. उत्कृट भाषाशैली प्रभावी व परखड बोलणे ही त्यांची खास ओळख होती. समाजाप्रती असलेली निष्ठा व अतोनात प्रेमामुळे त्यांनी समाजाची अविरतपणे सेवा केली .त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे त्यांना सलग दोन वेळेस मावडी सुपे गावच्या सरपंच पदाचा मान देखील मिळाला होता.मागील काळात त्यांनी विकास सोसायटीच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या समस्या अलगदपणे सोडवल्या होत्या .तर राजकारण विरहित केलेल्या विकास कामांसह समाज कार्यामुळे त्यांनी समाज बांधवांच्या घराघरात व तरुणांच्या हृदयात आपले स्थान पक्के केले होते.मात्र त्यांच्या निधनामुळे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता हरपला अशीच भावना येथील ग्रामस्थांसह वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.ज्ञानोबा देवकर ह...

*माझा शेतकरी, युवा वर्ग, महिला ,कष्टकरी सुखी समृद्ध होऊ दे ,राज्यात जातीय धार्मिक सलोखा नांदू दे गणरायाच्या चरणी साकडे* ~अनिताताई खरात

इंदापूर:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थी दिवशी इंदापूर शहरातील व परिसरातील अंदाजे 30ते 32 गणेश मंडळांच्या गणपतीला तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन गणेशाची पूजा करून मोत्याची माळ अर्पण केली, यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की आज गणेशाची पूजा करून माझ्या शेतकरी राजाला युवकांना महिलांना गोरगरीब कष्टकरी यांना सुखी समृद्ध ठेव तसेच राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना गुण्यागोविंदाने सलोख्याने राहण्याची बुद्धी दे, तसेच सर्व गणेश मित्र मंडळातील गणेश भक्तांना विनंती केली की आपण मिरवणूक काढत असताना आपल्यामुळे किंवा आपल्या डीजेच्या आवाजामुळे लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकना त्रास होणार नाहि किंवा गुलालाची उधळण करताना दुसऱ्याच्या डोळ्यांना इजा होऊन त्याचा वाईट परिणाम होऊ नये, मिरवणूक पाहण्यास आलेल्या महिलांचा व युवतींचा आपण सन्मान करावा तसेच मिरवणूक शांततेत व आनंदात पूर्ण करावी अशी विनंती सर्व मंडळांना करून आज बप्पाचे आशीर्वाद घेतले, यावेळी अनेक गणेश मंडळांनी तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे सद्दाम भाई बागवान ओंकार सुतार व इतर...

सरडेवाडीत गणेशोत्सव धुमधडाक्यात

 इंदापूर असिफभाई शेख यांज कडून  तालुक्यातील सरडेवाडी येथील भगत वस्ती येथे आरतीचा मान दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांना देण्यात आला. आरती वेळी जेष्ठ मार्गदर्शन सर्जिराव भगत,पोपट भगत, गोविंद पिंपरे, देविदास कडाळे, बाळासाहेब जाधव, राजेंद्र भगत, हनुमंत जमदाडे, गोकुळ कोकरे,संतराम (बंडु) लोंढे, गणेश भगत,दादासो भगत,अतुल भगत, सुरेश भगत,अजय भगत, सचिन भगत, भारत पिंपरे, किशोर कडाळे, तुकाराम रांजवण, माऊली जाधव, सोमनाथ भगत, गणेश मंडळाचे अध्यक्ष इंजिनीयर शुभम (बबलू) पिंपरे तसेच मंडळाचे कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरडेवाडीत गणेशोत्सवा निमित्त श्रीगणेशाची आरती चेअरमन विठ्ठल महाडिक यांचे हस्ते धुमधडाक्यात संपन्न

 इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथेल जमदाडे, कोळेकर वस्ती येथे दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी माजी सरपंच देविदास आण्णा कडाळे, बाळासाहेब जाधव, माजी उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ तात्या कोकरे, रघुनाथ आण्णा जमदाडे, मोहन भाऊ जामदार,बबन महाराज कोळेकर, सोपानराव कोळेकर, चंद्रकांत कोळेकर,आबासो कोळेकर, राजेंद्र कदम, संतोष कदम, अमोल जमदाडे, युवक हृदय सम्राट सचिन शेठ मोटे, गणेश मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब जमदाडे  तसेच अबाल वृध्द गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*इंदापूरच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या शिक्षण संस्थेला मिळाले ISO मानांकन.*

*इंदापूर ता.५* : डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या नामांकित शिक्षण संस्थेला (दि.३) बुधवारी ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे. प्राप्त मानांकाने शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.अशी माहिती संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी पत्रकारांना दिली. हे मानांकन एक आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन प्रणाली मानक आहे, जे संस्थेच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची आवश्यकता दर्शवते.एक जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानक आहे, जे कोणत्याही संस्थेच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची (QMS) तपासणी करते.  हे मानांकन संस्थेतील प्रक्रिया आणि व्यवस्थापन पद्धतींना अधिक प्रभावी बनवण्यासाठी मदत करते. शिक्षण संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे व विश्वस्तांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून, ही संस्था शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या मोठ्या ध्येयासाठी समर्पित आहे. असे ॲड. समीर मखरे यांनी नमूद केले. ही शिक्षण संस्था शिक्षण व सामाजिक उत्थानाच्या महान ध्येयासाठी का...

सरडेवाडीत गणेशोत्सवा निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम, कुणी जिंकला कुकर तर कुणी इडली भांडे

 इंदापूर असिफभाई शेख यांज कडून  तालुक्यातील सरडेवाडी तोबरेवस्ती येथे. दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक   यांच्या हस्ते जय हनुमान तरुण मित्र मंडळाची आरती करण्यात आली.या वेळी महिलांसठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, तळ्यात मळ्यात हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महिलांचे कार्यक्रम सरडेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सौ. गयाबाई अभिमान तोबरे यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी निनिरीक्ष म्हणून कुपकर गुरुजी यांनी कामकाज पाहिले.तळ्यातमळ्यात सुनेचा गट:१) प्रियांका तोबरे - कुकर २) विद्या कोकरे _ स्टिल डबा  ३)सविता तोबरे _ इडली भांडे सासुचा गट : १) राजाबाई तोबरे -कुकर २)जयाबाई कदम -स्टिलडबा  ३) शालन हरणावळ _इडली भांडे  संगीत खुर्ची  सुनेचा गट  १)भाग्यश्री तोबरे _कुकर २) अंकिता तोबरे -स्टिल डबा  ३)भारती तोबरे - इडली भांडे  सासुचा गट  १) वंदना तोबरे -कुकर २) नंदा तोबरे -स्टील डबा  ३) काविरा तोबरे -इडली भांडे  मुलांचा गट संगीत खुर्ची  रोहित तोबरे  तसेच प्रत्येक उपस्थित महि...

*रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा – अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर*

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न पुणे, दि. ३ : (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने प्रयत्न करावेत. अपघातग्रस्त भागांचा (ब्लॅकस्पॉट) सविस्तर अभ्यास करून योग्य उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, अनुराधा भंडारे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे संदेश चव्हाण, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील अपघातांचा आढावा देताना श्री. बाविस्कर यांनी सांगितले की, वार्षिक ९०० पेक्षा अधिक मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्त अपघाती भाग...

इंदापूरात गौराई पूजन निमित्त शिवकालीन खेडे गाव रचना देखाव्याने गौराई सजावट

 इंदापूरात  गौराई पूजन निमित्त शिवकालीन खेडे गाव रचना देखाव्याने गौराई सजावट करण्यात आली. जुन्या काळातील खेडेगाव हे नैसर्गिक वातावरणात वसलेले, स्वावलंबी आणि एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या समाजाचे प्रतीक होते. जिथे पारंपरिक व्यवसाय आणि जीवनशैली अस्तित्वात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापगड जवळील एका शिवकालीन खेडेगावात आजही जुन्या काळातील ग्रामपंचायतीची रचना बारा बलुतेदार पारंपरिक व्यवसाय व राजस्थान येथील महिला कोणत्याही मशीन यंत्राचा वापर न करता सर्व काम करतात. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात सर्व जाती धर्माच्या लोकांचे उद्योग करताना प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून असत त्यामुळे सहकार्याची भावना आणि विश्वास निर्माण होत. आजच्या पिढीला हे खुप प्रेरणादायी आहे. माझ्या शेजारी राहणारे नितीन पटेल यांची दोन्ही मुले अमेरिकेत आहेत. त्यांना त्यांच्या आईने माझ्या घरातील अशी गौराई सजावट सांगितली तेव्हा आम्हाला ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून ती सजावट पहायची आहे असे सांगितले... अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना हे खुप आवडले. आणि गौराई सजावटच्या माध्यमातून मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनो...

ज्येष्ठ पत्रकार लतीफ नदाफ यांना समाज भूषण पुरस्कार

पुरंदर प्रतिनिधी - सिकंदर नदाफ सामाजिक चळवळीचे प्रणेते, जेष्ठ पत्रकार तसेच भारतीय पत्रकार संघ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष लतीफ नदाफ यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  पुण्यातील साईबाबा नगर कोंढवा येथे नदाफ पिंजारी मन्सूरी जमात ट्रस्टच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मिरा नदाफ यांसह आरिफ मन्सूरी यांच्या हस्ते लतीफ नदाफ यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.       जेष्ठ पत्रकार लतीफ नदाफ यांनी गेली ४० वर्षांपासून जातीय सलोखा राखण्याहेतु मोलाचे योगदान दिले होते.तसेच लेखणीच्या जोरावर त्यांनी विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार व सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज देखील उठविला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना वयाच्या ७५ व्या वर्षी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी भारतीय पत्रकार संघासह सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच सांप्रदायिक क्षेत्रातून देखील लतीफ नदाफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष...

*नवी भाजपा पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर....!प्रविण माने यांच्यावतीने मान्यवरांचा सन्मान*

इंदापूर;- भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये इंदापूरचे आकाश' कांबळे यांना भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस पद तर गजानन भाऊ वाकसे यांना ओबीसी मोर्चा अध्यक्ष पुणे जिल्हा, शिवाजीराव निंबाळकर हे जिल्हाउपाध्यक्ष, नानासाहेब शेंडे यांना जिल्हा चिटणीस पद, तसेच प्रवीणकुमार शहा यांना पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा प्रविण माने यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र'जी मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसीत भारताची व भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. नव्याने करण्यात आलेल्या या निवडीमुळे भविष्यात पक्षाची ताकद आणखी वाढणार असून, सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षाशी जोडला जाणार असल्याची भावना यावेळी प्रविण माने यांनी व्यक्त केली.