इंदापूर:- माढा तालुक्यातील उंदरगाव,लोंढेवस्ती, सावंत वस्ती येथे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किट (साखर, रवा , पोहे, चटणी, मीठ, चहा पावडर , तेल, बिस्किट पुडे, मटकी डाळ तसेच कपडे (चादर शाल) हे साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात म्हणाल्या की इथे आल्यानंतर खरंच जीवन जगणे काय असते हे कळत आहे या लोकांची माय माऊलींची अवस्था पाहून मनाला खूप वेदना होतात. माझी मायबाप सरकारला विनंती आहे जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त मदत आपण यांना करावी. सरकारने सध्या बाकी सगळं थांबवावं आणि कोणतेही निकष न लावता या माझ्या बांधवांना मदतीचा हात द्यावा येथे कोणीही कोणते राजकारण करू नये येथील अधिकारी वर्गानेही मनापासून काम करावे जर खरच तुम्हाला थोड्याफार पुण्याचं काम करायचं असेल तर तुम्ही या लोकांना मदत करून ते पूर्ण करावे तुम्हाला यांचे खूप आशीर्वाद लागतील तसेच महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांनी मोठ्या उद्योगपतींनी किंवा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करावा हे संकट नैसर्गिक आहे आणि याचा सामना करण्याची ताकद या माझ्या माय माऊलींना ईश्वराने द्यावी याच माझ्या या नवरात्रीत देवीकडे प्रार्थना असतील, तसेच दुसरीही माझी जे सध्या मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव करतात त्यांना विनंती आहे की आपण नवरात्र उत्सवाचा थोडाफार खर्च कमी करून मदत म्हणून पूरग्रस्त भागात काही करता आली तर करावे ही माझी विनंती राहील.तसेच त्यांनी सांगितले की आम्ही आपणास फुल नाही फुलाची पाकळी मानून थोड्या फार मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच कोणत्याही माय माऊलींना कधीही काही अडचण आली तर आम्हाला आवाज द्या आम्ही हजर राहू,यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे सद्दाम भाई बागवान ,ओंकार सुतार, उपस्थित होते.
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या