इंदापूर:- वंचित बहुजन युवा आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर डॉ. निलेश विश्वकर्मा : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी, यांच्या संकल्पनेनुसार व मंगलदास तुकाराम निकाळजे (जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा पूर्व) यांचे माध्यमातून श्री. अशोक बाबु देवकर यांची वंचित-बहुजन आघाडी च्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून आपल्या सामाजिक कार्य, संघटन कौशल्य, प्रामाणिकपणा आणि वंचित-बहुजन समाजासाठी केलेल्या योगदानाचा विचार करून नियुक्तीपत्र देण्यात आले,आहे,
आपण संस्थेच्या नियमावलीनुसार संघटनेची ध्येयधोरणे, सामाजिक न्यायाची तत्त्वे, तसेच बहुजनांच्या हक्कांसाठी संघटनात्मक कार्य कराल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.म्हणूनच इंदापूर तालुका उपाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात येत आहे,अशोक देवकर यांना विचारले आसता ते म्हणाले का वंचित-बहुजन आघाडीचे कार्य व प्रकाश आंबेडकर यांचे विचार घराघरांत पोहोचणार आसे मत अशोकराव देवकर यांनी व्यक्त केले. अशोक देवकर यांनी इंदापूर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक राजकीय मोठे मोठे कार्यक्रम व विविध कार्य केल्यामुळे अशोक देवकर हे सर्वत्र एक उमदा आणि युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. या निवडीमुळे इंदापूर तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे अभिनंदनच वर्षाही झाला.
टिप्पण्या