इंदापूर :- भर पावसातही इंदापूर नगरपरिषद कर्मचारी पाणी पुरवठा दुरुस्ती, रस्ते साफसफाई आणि आपत्कालीन परिस्थितीत सेवा पुरवणे यांसारखी कामे करतात. या कामांमुळे नागरिकांचे होणारे हाल कमी होतात आणि शहराची यंत्रणा सुरळीत चालू राहते.
पाणी पुरवठा दुरुस्ती:इंदापूरातील एका नागरिकाच्या फोन वरून एका नगर परिषद कर्मचाऱ्याने भर पावसातही पिण्याच्या पाण्याच्या लाईनची दुरुस्ती केली होती, ज्यामुळे लोकांना पाणी मिळत नव्हते. रस्त्यावरील पाणी काढणे इंदापूर सारख्या शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली जातात, त्यावेळी नागरिक सुरक्षित राहावेत यासाठी नगर परिषद कर्मचारी रस्त्यांवरील पाणी,तुंबलेली गटर, जिवावर उदार होऊन काढण्याचे काम करतात.
आपत्कालीन सेवा पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्त्यांच्या वेळी नागरिकांना मदतीची गरज असते, तेव्हा नगर परिषद कर्मचारी मदतीसाठी धावून जातात आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवतात. त्यांच्या कामाचे महत्त्व नागरिकांचे संरक्षण:भर पावसातही काम करून ते नागरिकांचे जीवन सुरक्षित करतात. शहराची व्यवस्था राखणे:रस्त्यांवरील पाणी काढणे किंवा आपत्कालीन मदत करणे या कामांमुळे शहराची व्यवस्था चांगली राहते नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांना पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सेवा वेळेवर मिळतात. त्याही भर पावसात, पण ती ही माणसंच आहेत याचं जनतेनेही थोडं भान ठेवणं आवश्यक आहे, मुसळधार पाऊस पडत आहे,ते तरी काय करणार, पण आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत, सलाम त्यांच्या कार्याला....!
इंदापूर नगरपरिषद, इंदापूर*
*सार्वजनिक आवाहन*
हवामान खात्याच्या अंदाजानुसार इंदापूर शहर व परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की –
✅ सतर्क राहावे.
✅ अनावश्यक बाहेर पडू नये.
✅ नाले, ओढे, नदीकाठ व पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.
✅ वीजपुरवठ्याशी संबंधित धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे.
✅ नगरपरिषदेला आवश्यक ती माहिती व सहकार्य करावे.
🆘 यासाठी इंदापूर नगरपरिषदेमार्फत आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा :
रश्मी बारस्कर - 7058611816
शिवदत्त भोसले - 9421950958
स्वप्निल शेंडगे - 95112 11700
स्वप्निल हाके - 9762723380
ज्ञानेश्वर तिकांडे - 95032 46402
👉 आपल्या सहकार्याने आपण सर्वजण सुरक्षित राहूया.
– इंदापूर नगरपरिषद, इंदापूर
टिप्पण्या