आज शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज कालठण नं.1 इंदापूर येथील जिजाऊ महाविद्यालय येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या शक्यता, तयारी आणि योग्य दिशा निवडण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले, तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे व त्यांचे महत्त्व समजून सांगितले. टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्याचे आवाहन केले.
या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या स्वारस्याने भाग घेतला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली.जिजाऊ महाविद्यालयाच्या प्राचार्य जगताप मॅडम तसेच चेतना फार्मसी चे प्रा. चिंतामणी रणवरे आणि दत्ता कडवळे यांचे सहकार्य मिळाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विजय भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या