*चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे उच्च शिक्षण व भविष्यातील करियर नियोजन विषयी तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन*
इंदापूर वार्ताहर: आज शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इंदापूर येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना फार्मसी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अकरावी व बारावी v विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात करिअर निवड ही विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान असून, या पार्श्वभूमीवर करियर कसे निवडावे, स्पर्धा परीक्षा तयारी कशी करणार, जीवनात कष्ट, आत्मविश्वास, चिकाटी कशी महत्त्वाची असते, उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत असा विविध विचार व्यक्त केले. तसेच आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, शासकीय सेवा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांविषयी उपयुक्त माहिती दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, योग्य दिशेने पाऊल टाकण्यासाठी या व्याख्यानाचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत प्रा. विजय धेंडे सरांनी व्यक्त केले.
या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली. सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य.श्री.संजयकुमार शिंगारे सर, प्रा. विजय धेंडे सर तसेच चेतना फार्मसीचे प्रा. चिंतामणी रणवरे आणि श्री. विकास हुबाले सर यांचे सहकार्य मिळाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या