इंदापूर : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर च्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या भावनेने प्रेरित होऊन संस्थेचे विद्यार्थी व तरुणांसह समाजातील विविध स्तरांतील लोकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री.अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख श्री.महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री.भारत बोराटे, इन्चार्ज श्री.दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी श्री.सागर कांबळे,शिवाजी गोफणे, डॉक्टर सारंगी कुंभार, जावेद हबीब विभाग प्रमुख अमोल राऊत, फॅशन विभाग प्रमुख सौ.त्रिशला पाटील, रोहिणी जाधव, केदार गोसावी, भारत माने, मानसी पाटील यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते. शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी स्व. शंकरराव पाटील यांच्या समाजसेवेच्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांची सामाजिक परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
“मानवतेसाठी रक्तदान, हीच खरी स्मृतीश्रद्धांजली” असा प्रेरणादायी संदेश या शिबिरातून देण्यात आला.
टिप्पण्या