बाभुळगाव ग्रामपंचायतीत सरपंच–ग्रामसेवकांच्या मनमानीला कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता राजाराम इंगळे देणार राजीनामा.
इंदापूर, इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत सदस्य संतप्त झाले आहेत. विकासकामे थांबलेली, निधीचा पारदर्शक वापर न होणे, सदस्यांचा सल्ला न घेता निर्णय घेणे अशा अनेक तक्रारींमुळे ग्रामपंचायतीत गंभीर असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व मनमानी पद्धतीने चाललेल्या कारभाराला कंटाळून सौ.संगीता राजाराम इंगळे या राजीनामा देणार आहेत.
सौ.संगीता राजाराम इंगळे सदस्यांचे म्हणणे आहे की, "ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक कोणत्याही कामाची माहिती ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना देत नाहीत. निधी खर्चातही अनियमितता आहे. यामुळे गावकऱ्यांसमोर आमची प्रतिमा मलिन होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही या अन्यायकारक व मनमानी कारभाराचा भाग होऊ शकत नाही."
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य सौ.संगीता राजाराम इंगळे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सौ.संगीता राजाराम इंगळे सदस्यांचे म्हणणे आहे की, लोकांनी विकासासाठी निवडून दिले, मात्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या हुकूमशाहीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे.इंगळे यांच्या राजीनाम्यामुळे ग्रामपंचायतीच्या पुढील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असून, ग्रामस्थांचे लक्ष या घडामोडींवर लागले आहे.
टिप्पण्या