*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाखेवाडी मधील खेळाडूचें राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश*
इंदापूर*सब ज्युनियर राष्ट्रीय कुराश स्पर्धा* या अग्रसेन धाम रायपुर, छत्तीसगड येथे दिनांक 10/09/2025 ते 13/09/2025 संपन्न झाल्या यामध्ये भारतातील सर्व राज्यातून *550* खेळाडू सहभागी झाले होते,यामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 55 खेळाडू सहभागी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे
मधील
*पै.युद्धवीर गायकवाड 50KG प्रथम क्रमांक*
*कु.पै.अण्वि गायकवाड 28 kg या गटांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला*
तसेच 1) कु.पलक काळे
2) चि.रणवीर गायकवाड
3) कु.आरोही गायकवाड
4) चि.ज्योतिरादित्य गायकवाड
5) चि.आदिराज गायकवाड या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे नाव संपूर्ण भारतभर केले तसेच महाराष्ट्र राज्याचे नाव लौकिक केले याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे,अध्यक्ष श्रीमंत ढोले,
*उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच यांना क्रिडा विभाग प्रमुख प्रशिक्षक शिवराज तलवारे ,अविनाश कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले..तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या*
टिप्पण्या