पुरंदर तालुक्यात विकास कामांच्या जोरावर नावारूपाला आलेल्या सुकलवाडी ग्रामपंचायतीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत ग्राम गौरव प्रतिष्ठान तसेच आरोग्य भूमी आयुर्वेद आणि योग स्वास्थ्य व संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिबिराचे उद्घाटन माजी पोलीस उपअधीक्षक सुधाकर टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले .या शिबिरात ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आली.
या प्रसंगी कर्तव्यदक्ष सरपंच संदेश पवार यांसह ग्रामपंचायत सदस्या उर्मिला पवार माजी उपसरपंच सुवर्णा चव्हाण गणेश शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉ.शाम येत्तलवाड समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्विनी पवार आरोग्य सेविका जयश्री काळेल सुप्रिया पवार वनिता पवार माधुरी पवार आशा सेविका माधुरी दाते पद्मा भुजबळ, मनीषा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या