सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नातेपुते येथील महा किड्स सी.बी.एस.ई स्कूल मधील इयत्ता ६ वी मधील विद्यार्थिनी कु.वैष्णवी रवींद्र कर्चे हिने १४ वर्षीय मुलींच्या वयोगटातून तालुका पातळीवर दिमाखदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकविला आहे. यावेळी स्पर्धा स्विस पद्धतीने वयोगट १४ तसेच १७ आणि १९ मध्ये घेतल्या गेल्या. या स्पर्धेत वैष्णवी कचरे हिने एकूण ५ पैकी ४ मॅच जिंकत ३८.२६. पॉईंट्स मिळविल्याने तिची निवड जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक अँड.शिवशंकर पांढरे यांनी तिचा सन्मान केला.
याप्रसंगी संस्थेच्या कॉर्डिनेटर विद्या घोगरे क्रीडा शिक्षक रणजित मोहिते व कोमल रणदिवे उपस्थित होते.
टिप्पण्या