इंदापूर तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालय पुणे, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ पुणे व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यां साठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 31 मे 2024 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तंत्र शिक्षण संचालनालय चे माजी संचालक डॉ. एन.बी पासलकर व प्रमुख व्याख्याता डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे चे माजी प्राचार्य डॉ.विजय वढाई हे उपस्थित होते. तसेच शासकीय तंत्रनिकेतन, पुणे चे प्राचार्य व ऍडमिशन नोडल ऑफिसर डॉ. आर.के. पाटील आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे व्याख्याता श्री. परांजपे सर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी केले याप्रसंगी बोलताना त्यांनी खरे शिक्षण हे दहावी व बारावीनंतर सुरू होते व व्यावसायिक शिक्षण घेताना, निर्णय कधी व कसा घ्यावा व त्याचा उपयोग स्वतःसाठी व तसेच समाजासाठी कशाप्रकारे होतो याचे थोडक्यात विवेचन केले .पॉलिटेक्निकला प्रवेश कशाप्रकारे घेता येतो याविषय...
SHIVSRUSTHI NEWS