मुख्य सामग्रीवर वगळा

दागिन्यांची किंवा पैशांची भिशी नसून चक्क इंदापूरात ‘झाडांची भिशी’ ही कल्पनाच आदर्शवत,हरीत इंदापूर

इंदापूर:- दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? सायराभाभी आतार यांनी नगराध्यक्षा सौ.अंकिताताई मुकुंदशेठ शहा ,रश्मी निलाखे, वर्षा ननवरे , कल्पना भोर, चंद्रकांत देवकर अशोक चिंचकर , प्रशांत गिड्डे , धरमचंद लोढा, प्रशांत सिताप सह इतर काही लोकांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्‍य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दिनांक १८/५ / २०२४ . वार शनिवार . पर्यावरणात तापमानात सतत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे याला कारण मोठया प्रमाणात झाडांची होणारी कत्तल असून त्यावर उपाय म्हणजे झाडे लावा झाडे जगवा .हेच उत्तर आहे म्हणूनच या उपक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन पर्यावरण संतुलनासाठी एकत्र येऊन झाडांची भिशी ची यासंबंधी चर्चा करणे साठी मराठी शाळा क्र . १ व २ नगर परिषद जवळ मिटींग आयोजीत करणेत आली होती त्यास सर्व स्तरातून पहिल्याच मिटींगला १०६ सभासद मिळाले या मधे डॉक्टर ,वकिल ,पतंजली योग साधक, शिक्षक , पोलीस स्टेशनचे कर्मचारी बांधव व सूज्ञ निसर्ग प्रेमी मंडळींनी यात आपला सहभाग नोंदवला . यावेळी इंदापूर शहरात प्रत्येक महिन्याला वृक्षांचे रोपण करण्याचे ठरले . तसेच याची सुरुवात म्हणून सभासदाने सुरुवातीला १ झाड म्हणाजे १०६ झाडे लावण्यात येणार आहेत  सावली देणारे व जमिनी मध्ये जलस्त्रोत निर्माण होईल अशा झाडांना म्हणजेप्रामुख्याने वड, लिंब, उंबर, चिंच, पिंपळ, बकुळ, करंज, रेन ट्री, गुलमोहर, नीलमोहर, भोंडर, पांगरा, अर्जुन, कांचनार, अंजन, सप्तपर्णी, जांभूळ, कडुनिंब, काशीद, बेल, सावर, काटेसावर, कवठ, पिंपरान, आवळा, बेहडा या झाडांना प्राधान्य दिले जाते. अशी झाडे प्राधान्याने लावण्यात येणार आहेत या वेळी पर्यावरण वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरले .शैक्षणिक संस्था, शाळा, मैदान, कॉलनी, रस्तेसोसायटी, शाळा, संस्थेच्या परिसरात रोपे लावायची त्याचे संगोपन करणार आहे, ,हरीत व स्वच्छ इंदापूरात आणखिन भर पाडणार आहे आशी माहीती हमिदभाई आत्तार यांनी दिली, 
*******************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...