इंदापूर प्रतिनिधी : दि. ३० मे रोजी इंदापूर शासकीय विश्राम गृह येथे महाराणी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती इंदापूर यांची नुकतीच बैठक पार पडली यामध्ये २३ जून रोजी इंदापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती तालुकास्तरीय मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमासह पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढुन साजरी करण्याचे यामध्ये ठरले तसेच उद्या दिनांक ३१ मे रोजी सकाळी ९:३० वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील समाज बांधवांनी इंदापूर न्यायालय शेजारी असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले असून अध्यक्षपदी लक्ष्मण देवकाते तर कार्याध्यक्षपदी किरण गोफने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे. ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे. सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते. खऱ्य...
टिप्पण्या