यंदा अहिल्याबाई होळकर कॉलेजचा १२ वीचा निकाल ९५.५५% लागला,विज्ञान शाखेचा:- १०० %,तर कला शाखेचा ८४.६१.% निकाल.
इंदापूर( दि.२१*) : - येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व कला शाखेच्या मुला- मुलींचा बारावीचा निकाल ९५.५५ % टक्के लागला असून दोन्ही शाखेंनी कॉलेजच्या यशाची परंपरा कायम राखत यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे.
यावेळी कॉलेजच्या विज्ञान शाखेचे ३२ परीक्षार्थी परीक्षेस सामोरे गेले.सर्व ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेचे १३ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
*विज्ञान शाखेचे पहिले तीन मानकरी*
- *शेकडा गुणांसह -*
*प्रथम क्रमांक -१) कु. शेंडगे वैष्णवी कांतीलाल ६७.३३%*
*द्वितीय क्रमांक- २) कु.काळेल ज्योती दादा ६५.८३ %* *( मराठीत ९३ गुण)*
*तृतीय क्रमांक -३) मोरे रेश्मा सुखदेव - ६१.५०%*
*कला शाखेचे पहिले तीन मानकरी*
*शेकडा गुणांसह -*
*प्रथम क्रमांक- १) कु.पोळ साक्षी रामचंद्र .- ६६.६७ %*
*द्वितीय क्रमांक- २) - कु. सुखदेव शामल अरुण.६४.८३ %*
*तृतीय क्रमांक- ३) निकम नाथाजी अंकुश- ६०%*
वरील मानकऱ्यांसह उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे व प्राचार्या अनिता साळवे यांचे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी अभिनंदन केले.
तसेच यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
टिप्पण्या