*भिमाई आश्रमशाळेत पँथर रत्नाकर मखरेंना तृतीय स्मृतीदिनी अभिवादन !!*
*इंदापूर* ( दि.१४ ) :- इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत पँथर रत्नाकर मखरेंच्या (तात्या) तृतीय स्मृती दिनाचा कार्यक्रम (दि.१४) भिमाई आश्रमशाळेत छोटेखानी पार पडला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बौद्धाचार्य किशोर धाईंजे यांच्या हस्ते व आयु. शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे,संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीयांच्या उपस्थितीत दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या) समाधीस्थळी त्रिशरण पंचशील घेऊन पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गोपीचंद गलांडे,माऊली नाचण, हनुमंत कांबळे,बाबजी भोंग, नानासाहेब चव्हाण, मधुकर जगताप, संग्राम भैलुमे,राहुल शिंगाडे, महेश लोंढे,गोरख तिकोटे, संजय कांबळे,युवराज बन, संतोष शेंडे, अश्वजीत कांबळे, ॲड.सूरज मखरे, तेजस मखरे,अक्षय मखरे, साहेबराव पवार,शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
टिप्पण्या