मुख्य सामग्रीवर वगळा

रेडा गावाच्या सरपंच सौ‌. सुनीता देवकर यांनी दिल्लीची लढाई जिंकली ; सत्यासाठी दिल्ली गाठली...!!मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सरपंच पदाची न्यायालयीन लढाई दिल्लीपर्यंत नेणाऱ्या पहिल्या सरपंच म्हणून इंदापूर तालुक्यात आगळीवेगळी चर्चा 

इंदापूर;-  तालुक्यातील रेडा गावातील ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी यांना सात जागांवर विजय मिळाला होता आणि विरोधक राष्ट्रवादीला दोन जागेवर विजय मिळाला होता‌. त्यानंतर राजकीय स्वार्थ पोटी, राजकीय खलबत्त करून नेमका शब्द कोणी कोणाला दिलाय हे सर्वसामान्य जनतेला आणि पार्टीच्या  कार्यकर्त्यांना माहित नाही‌. नेमका हा असा म्हणाला आणि तो असा म्हणाला,मी असं केलं, मी तसं केलं  अशी उडवा उडवीची उत्तरे आणि  गावात जिकडे तिकडे चर्चा ऐकायला मिळत होती.खर काय हे अजून नागरिकांना माहिती नसून नेमके काय कारण घडलं की, रेडा गावातील राजकारणाचा चिखल झाला आहे ‌.


 त्यानंतर खोटेनाटे आरोप करून  राजकीय वरदहस्तानी ग्रामसेवक हाताला धरून, गटविकास अधिकारी यांना हाताशी धरून  लोकप्रतिनिधी,तालुका अध्यक्ष ,नातेवाईकांचा हातभार घेऊन  आयुक्त, जिल्हा अधिकारी यांच्याकडे सरपंचाच्या विरोधात तक्रारी करून सरपंच आणि सदस्य पद रद्द करायला  भाग पाडले‌. त्यानंतर अपिलात तक्रार करणे, वरिष्ठ कोर्टात न्याय मागण्यासाठी अपील करणे अशा घटना घडत गेल्या . पुणे आयुक्त यांच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती  दिल्यानंतर त्या  निकालाच्या विरोधात हायकोर्टातून स्थगिती उठवण्यात आली होती.
रेडा गावच्या महिला सरपंच सौ. सुनीता देवकर हार मानतील त्या कसल्या..!! सत्यासाठी दिल्ली थेट  गाठली. ग्रामविकास मंत्र्याच्या निकालाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पार्टीने मुंबई उच्च न्यायालयातून दिलेल्या स्थगिती आदेशाला रेडा गावच्या सरपंच  सौ.सुनीता देवकर यांनी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात अपील केले.

रेड्या गावच्या सरपंच सौ .सुनीता नानासाहेब देवकर आणि त्यांची पती नानासाहेब जालिंदर देवकर हे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थ म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकार्य यांनी हार न मानता थेट दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्या दादेला यश आले . अखेर रेड्या गावच्या महिला सरपंचांनी दाखवून दिलं सत्य सत्य असतं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या सरपंच सौ. सुनीता नानासाहेब देवकर यांच्या अपिलाच्या वरती ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्थगित आदेश मिळवला होता. त्या स्थगिती आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे आणि पुन्हा रेड्या गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. सुनीता नानासाहेब देवकर यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात मुंबई उच्च निकाला स्थगिती आदेशाबाबत  ताशेरे ओढण्यात आले असून दिल्ली सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या देशात असे म्हटले आहे की,
दरम्यान, दि.२० मार्च २०२४  रोजी  मुंबई  येथील उच्च न्यायलयाने पारित केलेल्या अस्पष्ट आदेशाची कार्यवाही स्थगित राहील. परिणामी, प्रभारी मंत्र्यांनी दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेली अंतरिम स्थगिती पुनर्संचयित केली जाईल आणि याचिकाकर्त्याला पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतीच्या सरपंचाची कर्तव्ये पार पाडण्याची परवानगी दिली जाईल. तथापि, गुणवत्तेवर अपीलाचा निर्णय घेण्याच्या सक्षम अधिकाऱ्याच्या मार्गात या कार्यवाही प्रलंबित राहणार नाहीत. असे सर्वोच्च न्यायालय यांनी आपल्या स्थगिती आदेशात म्हटले आहे.



 शेवटी रेडा गावच्या सुनिता देवकर सरपंच यांनी दिल्लीची लढाई जिंकलीच आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने गावच्या सरपंच पदावर भाजपचे कट्टर सरपंच पुन्हा विराजमान झाले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील रेडा गाव हे महाराष्ट्रात चर्चेत आले असून सरपंच पदासाठी दिल्लीत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोकवणारे गाव म्हणून ओळख झाली आहे. रेडा गावात एक हर्ष उल्हास,आनंद उत्सव केला जात आहे.अखेर सत्याचा विजय झाला अशा शब्दात सरपंच सौ.सुनीता देवकर यांनी आपली भावना व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...